कस असत हे नातं
कस असत हे नातं....... Feeling नात्यांचा गोधंळ मला लिहावस वाटतय म्हणुन थोड लिहितो,पण काय लिहु याच गोष्टींने मनात गोधळ केलाय.कारण आपल्या आयुष्यात जशी अनेक नाती गोंधळ करतात ना तसच एकंदरित,खरच आपण कोठे तरी आपल्या आयुष्यातल्या नात्यांना कायमचं दुर करतो आजकालच्या जगात..याच गोष्टीची एक खंत वाटते मनाला आपल आयुष्य हे माणसांनच्या आनंदाने खुलेल असत,पण त्याच माणसांना दुर केल्यावर तो आनंदही जातो आपल्या आयुष्यातुन.हेच सगळीकडे पाहियाला मिळत या दुनियेत,मला फक्त हेच कळत नाही कि माणसं इतकी वाईट का होतात लगेच.कोणतही नात जोडु शकतो आपण पण तेच नात तोडु नाही शकत दुसऱ्याचा मनाचा विचार करावा लागतो.परवाच माझ्या ऐकण्यात एक बातमी आली कि एका मुलांने आपल्या आईवडिलांना वृद्धाआश्रमात पाठवल. काय हे आजकालची मुल ज्यांनी आपल्याला जन्म दिला लहानास मोठ केल त्यांना आपल्या पासुन दुर केल खरच काय माणसं एक एक विचित्र असतात. त्यांना आईवडिलांच नात काय आहे हे समजल नसत काही, मुलांचा आपल्या वडिलांबरोबरचा...