कस असत हे नातं

  कस असत हे नातं.......
                               Feeling नात्यांचा गोधंळ


मला लिहावस वाटतय म्हणुन थोड लिहितो,पण काय लिहु याच गोष्टींने मनात गोधळ केलाय.कारण आपल्या आयुष्यात जशी अनेक नाती गोंधळ करतात ना तसच एकंदरित,खरच आपण कोठे तरी आपल्या आयुष्यातल्या नात्यांना कायमचं दुर करतो आजकालच्या जगात..याच गोष्टीची एक खंत वाटते मनाला आपल आयुष्य हे माणसांनच्या आनंदाने खुलेल असत,पण त्याच माणसांना दुर केल्यावर तो आनंदही जातो आपल्या आयुष्यातुन.हेच सगळीकडे पाहियाला  मिळत या दुनियेत,मला फक्त हेच कळत नाही कि माणसं इतकी वाईट का होतात लगेच.कोणतही नात जोडु शकतो आपण पण तेच नात तोडु नाही शकत दुसऱ्याचा मनाचा विचार करावा लागतो.परवाच माझ्या ऐकण्यात एक बातमी आली कि एका मुलांने आपल्या आईवडिलांना वृद्धाआश्रमात पाठवल. काय हे आजकालची मुल ज्यांनी आपल्याला जन्म दिला लहानास मोठ केल त्यांना आपल्या पासुन दुर केल खरच काय माणसं एक एक विचित्र असतात. त्यांना आईवडिलांच नात काय आहे हे समजल नसत काही, मुलांचा आपल्या वडिलांबरोबरचा संवादच नाहीशा झाला,वडिलांना बरोबर साधा बोलायला पण मागत नाही आपले निर्णय स्वाताच घेतात साध वडिलांना सांगवस वाटत पण नाही.एक बाप आणि मुलगा यांच्या नात्यावर का कोण कविता लिहित नाही त्याच कारण एकच त्या मुलांना आपल बापच कळला नसतो....आई आणि मुलावर खुप काही कविता ऐकतोय पण आई आणि मुलीच्या नात्याबद्दल कोणच काही लिहित नाही आणि बोलत सुद्धा नाही,एका स्त्रियच दुखन एक स्त्रिच चांगल समजु शकते ना मग..,आई आणि मुलीमध्ये होणारा संवादच कुठेतरी नाहीशा होत चालेला आहे.त्यामुळे त्या आईच पत्र कुठेतरी खरच हरवत चालेल आहे अस का.......हा अजुन एक सांगायच राहिल, आजकालची तरुण पिढी फक्त शाररिक संबध ठेवण्यासाठी नात्यात राहते,हे असच तर होतच असत.त्यांना प्रेम म्हणजे काय याचाच अर्थ कळला नसतो,चित्रपटात,मालिकेमध्ये प्रेम नावाची जी व्याख्या सांगतात ना तिचे आपल्या आयुष्यात घेतात.आणि शाररिक संबध जोडतात.पण त्यांच हे प्रेम टाईमपास पुरतच राहित.काय उपयोग मग असल नात जोडुन जी मुलगी काही मुलांना सेक्स करण्यासाठी पाहिजे असते.मग नका ना जोडु अस कुठल नात प्रेम हे नातच खुप वेगळ आहे.त्यापेक्षा मैत्री करा, ते मैत्रीचे क्षण तसेच ठेवा पण आजकाल ते मैत्रीच नात राहिल कुठे साध दोन मुल मुली एकत्र बोलताना दिसली कि लगेच काही माणसं त्यांच्यावर संशय घेणार हे असच होतोय.खरच आजकाल प्रेम ही गोष्ट फालुत होत चालेल आहे,त्याच कारण आजचा बदलेला तरुण वर्ग आणि बदलेला समाज....काही महिन्यापुर्वी मी एक टिव्हि वर न्युज पाहिली कि दोन तरुणी एकमेकांवर प्रेम करत होत्या घरी समजल्यावर त्यांनी आत्महत्या केली,आपल्या पाशाच्तय देशात समलैंगिता   ( homosexual)  याला बंदी आहे.म्हणजे कोणी संमलैगिता करायचीच नाही.पण एखाद्या मुलीला समजा एक मुलगी आवडली तिला एक किस घ्यायचा या भावना असतात प्रत्येक मुलीला ज्या घरात पुरुषांच वातावरण जास्त आहे अशा मुलींना वाटणार हे असल आकर्षण होणारच कारण एका बाईच दुख एक बाईच समजु शकते ना,तिला काय होत तिच्या शाररिक,मानसिक त्रास एक बाईच जाणु शकते ना.पुरुष जाणुन काय करणार,काही पुरुषांमध्ये पण आकर्षण होत एका पुरुषाला एक पुरुषाबरोबरच प्रेम संबध ठेवावेत वाटतात.या गोष्टीला भारतात बंदी केली आहे पण अस का  होत हे कारणच कोण शोधत नाही पुरुषांन पुरुषाबरोबरच का नात जोडाव लागत.यांचे पण काहीतरी प्रश्न असणार ना,त्यामुळे समलैगिंकतेच वाढत त्यावर बंदी आणुन काय उपयोगाच नाही,उलट अशा व्यकती बरोबर संवाद साधाला पाहिजे,त्यांच्या अनेक प्रश्नांना उत्तर मिळुन दिली पाहिजे,हे नात नैसर्गिक आहे.....खरच हे नात कस असत ते अजुन काय समजत नाही कारण आपली मांणस जेव्हा सोडुन जातात ना तेव्हा तर खुप त्रास होतोय,आपली  बहिण सासरी जाते  तेव्हा खरच खुप वाईट वाटतय,आपल्याला रागवणारी ,आपल्या चुका दाखवणारी ति ताईच असते.आईबाबा कधी आपल्याला मारत असले कि आपल्याला वाचवायला येणारी ति ताईच असते.आणि तिच दुर गेल्यावर घर अगदी सुन सुन होत,एकदम शांत.....भावा बहिणच नात खरच खुप स्पेशल असत...नांत्याची खरी गम्मत वेगळीच आहे.आपले शेजारी,आपली भावकी जरी हे अनोळखी असले तरी सख्या माणसांप्रमाणे आपल्या सतत मदतीला धावुन येतात.पण आजकाल शेजारपाजार पण कठेतरी बदलत चाललाय,एकंदरीत नात नावाचा कनस्पेटच या जगात नाहीस होत चालेला आहे.माणसंला साध भेटायला फोन , watsapp ,फेसेबुक वर बोलायला वेळ नाही.सगळे भेटतात पण कोणाच्या लग्नाच्या समारंभात,नायतर कोण व्हॅटिंलेटरवर असल्यावर.त्यानंतर कोणच भेटत नाही,बोलततर नाहीत.पण काय उपयोग असल्या नात्यांचा ज्या नांत्याना एकत्र येणे म्हणजे काय हेच माहीत नाही ना,मग का जोडायची असली नाती...मला जेवढ माहित आहे तेवढच बोलतोय मी आजकाल माणुसं माणसापासुनच हरवत चालला आहे,त्याला ति माणसांन मधली नाती या स्पर्धेच्या युगात- धावपळीच्या युगात दिसत नाही आहे.त्याच कारण आपली बदलेली दुनिया...आपल्याला एखाद्याला भेटायच झाल तर कॉल करुन त्याची appointment घ्यावी लागते,त्याशिवाय ति माणसं भेटत नाही आपल्याला.ऐवढा बदलला माणुसं आजकाल त्याला नातच समजल नसत काय आहे ते,अस म्हणतात कि “नात हे एक प्रकारचा फुलांचा गुच्छ आहे,टवटवीत दिसणारा जर याच्या नात्यात भांडण.संशय आणल तर तो फुलांचा गुच्छ कसा सुकुन जातो तस ते ,नात पण दुरावेल...त्यामुळे आपल्या माणसांना दुखवु नका,त्यांच्या बरोबर संवाद साधा.आपल्या माणसांनच्या नात्याचा फुलांचा गुच्छ असाच टवटवीत फुलला पाहिजे तरच त्या नात्यांची खरी गम्मत कळते.........!”

         खरच कशी ही असु दे नाती,पण ते नात वाऱ्यासारख क्षणार्धात आपल्या आयुष्यात येत,चांगले आनंदाचे क्षण देऊन भुर्रकन उडुन जात,ते आपल्याला कळत पण नाही,आपण कुठे तरी या नांत्यांना घेऊन गोधंळलेलो असतो.  पण ती नाती आपल्या आयुष्यात खरच आनंदाचे क्षण आणतात.आईवडिलांच नात एका मैत्रीसारख असत,बहिणभाऊ,मित्रमैत्रिणी यांच नात एका बेस्ट फ्रेंड सारख पण असु शकत ना,फक्त या नात्यांमधला सारांश कळला पाहिजे आपल्याला.त्यासाठी आपल्याला माणसं कळली पाहिजे ते बोलल्याशिवाय,संवाद सादल्याशिवाय कस समजणार, म्हणुन आपल्या माणसानं बरोबर बोलत जावा बोलकि माणसं जास्त कळतात.त्यामुळे बोला आपल्या नात्यांचे बंध एकदम स्पेशल करा...खरच आत्ता कोठे तरी  समजल ते नात म्हणजे काय असत,आपण जर आपल्या माणसांन बरोबर सवांद साधला नाही तर ते नात कस टिकले..त्यामुळे आपल्या माणनंसाची बोललायच.कारण “संवाद हरवला कि नात संपतय अस बोलतात,त्यामुळे आपल्या व्यक्ती बरोबर संवाद झाला पाहिजे तरच ते नात कस आहे समजतय.................!”

लेखनः- अभय घाटगे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

लेख:-शहरातलं सोनं.....

तिच्यासाठीच्या कविता.......