पोस्ट्स

जुलै, २०१९ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

लेख:-पाऊसाची गोष्ट....

                 लेख:-  पाऊसाची गोष्ट....      बघता बघता पाऊसाला कधी सुरूवात झाली ते कळालं पण नाही,नुसतं पाऊस कधी पडतो असं झालेलं ,मग नायतर काय एकतर ऐवढ्या उकाड्याने जिव गुंदमरुन जातो खुपचं..पण पाऊस पडला ते खुपचं बर झालं..चला आता तो मातीचा सुंगध,आणि भोवतालीचा हिरवा निर्सग..काय मस्त combination जुळून आलं ना,जसं लहानपणी पाऊस पडल्यावर एक आकर्षण वाटायचं अगदी तसं झालं…पण आता कुठे आकर्षण वगैरे राहिलं पाऊसाचं…आता फक्त पाऊस नुसता ऑफिस च्या खिडकीतून अनुभवायचा,नायतर ऑफिस सुटल्यावर पाऊसातुन घरी जाण्याचा रस्ता शोधायचा…खरतर या सगळ्या मध्ये आमचा तो पाऊसच विसरून गेलो,त्या पाऊसाच्या सगळ्या गोष्टी नुसतं कोरड्या पडल्या कारण आता त्या गोष्टी अनुभवायलाच कोण नाही ना...पाऊस पडल्यावर ना एक गम्मत असायची,भर पाऊसात अंगातला शर्ट काढुन मस्त पैकी पाऊसाने साचलेल्या पाण्यात मनशोक्त पणे खेळायचो,बागडायचो…नंतर त्याचं साचलेल्या डबक्यात कागदच्या होड्या करून सोडायचो….स्व:ता बेभान होऊन प्रत्येक पाऊसाची सरी हळुवार अंगावर झेलायचो,किती भारी वाटायचं आता काय सांगु,प...