लेख:-पाऊसाची गोष्ट....

                 लेख:- पाऊसाची गोष्ट....

     बघता बघता पाऊसाला कधी सुरूवात झाली ते कळालं पण नाही,नुसतं पाऊस कधी पडतो असं झालेलं ,मग नायतर काय एकतर ऐवढ्या उकाड्याने जिव गुंदमरुन जातो खुपचं..पण पाऊस पडला ते खुपचं बर झालं..चला आता तो मातीचा सुंगध,आणि भोवतालीचा हिरवा निर्सग..काय मस्त combination जुळून आलं ना,जसं लहानपणी पाऊस पडल्यावर एक आकर्षण वाटायचं अगदी तसं झालं…पण आता कुठे आकर्षण वगैरे राहिलं पाऊसाचं…आता फक्त पाऊस नुसता ऑफिस च्या खिडकीतून अनुभवायचा,नायतर ऑफिस सुटल्यावर पाऊसातुन घरी जाण्याचा रस्ता शोधायचा…खरतर या सगळ्या मध्ये आमचा तो पाऊसच विसरून गेलो,त्या पाऊसाच्या सगळ्या गोष्टी नुसतं कोरड्या पडल्या कारण आता त्या गोष्टी अनुभवायलाच कोण नाही ना...पाऊस पडल्यावर ना एक गम्मत असायची,भर पाऊसात अंगातला शर्ट काढुन मस्त पैकी पाऊसाने साचलेल्या पाण्यात मनशोक्त पणे खेळायचो,बागडायचो…नंतर त्याचं साचलेल्या डबक्यात कागदच्या होड्या करून सोडायचो….स्व:ता बेभान होऊन प्रत्येक पाऊसाची सरी हळुवार अंगावर झेलायचो,किती भारी वाटायचं आता काय सांगु,पाऊस म्हणटलं कि डोळ्यासमोर येतो,समुद्र किनारा,मक्याचं कणीस आणि बरचकाही….खरतर पाऊसात समुद्र किनारी जाऊन समुद्राच्या लाटेचं पाणी जोरात दगडवार धडकुन अंगावर यायचं ना,तेव्हा काय तर एकदम भारीच वाटायचं….या पाऊसानानेचं आम्हा मुंबईकरांना जगण्यासाठी,लढण्यासाठी एक नवी जिद्द आमच्या मध्ये निर्माण केली…आपल्या आयुष्यात अनेक प्रॉब्लेम येतात,नवीन,नवीन संकट येतात पण त्या  सगळ्यांना कायमचं दुर करून नव्या जगाशी ओळख करून या पावसानेच दिली…पण कधी कधी एक खंत वाटते,साला हा पाऊस जरा वेडा आहे का म्हणजे कधीही येतो आणि कधीही जातो काहीच गणित कळतं नाही या पावसाचं…पण राहुन राहून सारखा एक विचार येतो,एकदा पहिल्या सारखं पाऊसात बागडावं,नाचावं..पण हे सगळं जुळूनच येत नाही, जरी  वाटलं तसं करावं तर लगेच सगळे म्हणणारं,"जरा बालिश आहे का रे तु.." मला तेच कळतं नाही, थोड थिल्लरपणाने आयुष्य उनाडलं तर लगेचं या सगळ्यांना बालिशपणा का वाटतो तेच काही केल्या कळतं नाही.. म्हणून तो पाऊस नुसता खिडकीतून बघायचा,नायतर डोळ्यांनी अनुभवायचा नुसता…..आणि आता तर कसलं काय तो पाऊसचं मी कधीच अनुभवता येणार नाही…नायतर त्या पाऊसात कधीच बागडता  येणार नाही.. कारण मला कँन्सर आहे, डॉक्टर ने सरळ सरळ बेडरेस्ट सांगितली..त्यामुळे तो पाऊस सध्या मी खिडकीतूनच न्याहाळत असतो,त्या पाऊसाची व्यक्तचं होतं असतो,पण तो पाऊस हल्ली पाहिजे तसा बोलतं नाही…मग एकटाच पाऊसाचं गाराण गातचं बसतो,तरीही तो पाऊस साध ओळखही दाखवतं नाही, का असं मी आता बाहेर पडतं नाही म्हणून कि…………….!
      पण आता सगळं ठरवयं,मरू दे तो कँन्सर, मरू दे ति सगळी माणसं…आता मी पडणार आहे बाहेर, माझं जगणं अनुभवायला,माझं जगणं गिरवायला….आणि त्या पाऊसाबरोबर पहिल्यासारखी चांगली गट्टी करायला….कारण नुसतं professional राहुन आपल्या मधल्या मी ला जर एकट सोडलं ना,तर आपणचं मुर्खासारखे एकट फिरत बसतो…पण आता मी पडणार बाहेर,तो पाऊस अनुभवायला…साला ऑफिस ला जातं होतो,तेव्हा पण पाऊसात मनसोक्तपणे उनाडता आलं नाही, नुसतं खिडकीतूनच पावसाला बघायचं,आणि कधी पाऊस जोराचा पडतं असेलं तर बॉस ला सांगुन हाफ डे घेऊन घरी जायचं..ऐवढचं रूटीन होतं,आणि आता तर हे असं झालं..म्हणजे चारही बाजुने बंदिस्त…इतका कोंडमार होतो काय सांगायचं,नुसतं कशात लक्ष लागतं नाही, सतत डोक्याला तणावं नुसता…..म्हणून आता ठरवलंय मी..जे काय करायचं ते मनोसोक्तपणे करायचं,एकदम बिनधास्त….कारण आयुष्य हे जगण्यासाठी असतं ना,मग त्याच आयुष्याला बंदिस्त करून आपणचं तिथल्या ते आयुष्य संपुन टाकतो….पण नाही आता आयुष्य जगण्याची वेळी आली आहे ,आणि ते जगायचं आपल्याला हवं तसं,अगदी आपल्या मनासारखं……म्हणून आज मी त्या पाऊसात मनसोक्तपणे माझं आयुष्य जगणार आहे,जसं लहान असताना,जरासं थिल्लरपणाने तो पाऊस अनुभवला…त्या पाऊसाची आणि माझी चांगली गट्टी जमलेली,पण आता तो पाऊस ओळखेल का…? कारण वय थोडं वाढलं ना,यामध्ये त्या पाऊसाला मी ओळखु येईल का..?  मला काय वाटतं तो पाऊस ओळखेलं मला,कारण ओळखं विसरायला तो माणुसं थोडीचं आहे, मग ओळखेलं तो पाऊस आमच्यातल्या त्या क्षणांना,आमच्यातल्या अनोख्या मैत्रीला तो नक्की ओळखेलं…….कारण एकचं म्हणावं वाटतं
   "शब्दांन मधले शब्द कधी बोलले,अर्थांनमधले अर्थ बघ सारे कळाले…जणु पाऊसांच्या सरीला उधाणचं उधाण आले……." 
   चला आता ठरवलंय तर मागे नाही हटायचं,त्या बरसणाऱ्या पाऊसात, थोडसं फ्रेश होययचं…काही आठवणी आहेत त्या व्यक्त करायच्यात,त्या बरसणाऱ्या पाऊसात……थोडसं मागे वळून पाहुन ,तोच धिंगाणा घालायचा त्या बरसणाऱ्या पाऊसात….तर कधी स्व:ताचं खर जगणं शोधायचं त्या बरसणाऱ्या पाऊसात,कारण आयुष्यात खुप खऱ्या गोष्टी असतात,पण आपणचं नको नको त्या खोट्या गोष्टींनमध्ये अडकतो…..पण आता त्या पाऊसाच्या सरीना अंगावर  झेलून खर जगणं गिरवायचं…..खऱ्या अर्थाने माणुसं म्हणून जगण्याचा आनंद घ्यायचा..त्या पाऊसाबरोबर निंतात गप्पागोष्टी मारायच्यात…जणु त्या पाऊसासोबत एक नवीन गोष्ट सांगायची,म्हणजे पावासाची गोष्ट...थोडशी आपल्यातल्या खऱ्या व्हिजनला शोधणारी,आणि नकळतपणे बऱ्याचं काही गोष्टी शिकवणारी…अशी त्या  पाऊसाची गोष्ट…......!
   
  लेखन:-अभय घाटगे.© 

*सुचना:- सदर लेखाचे सर्व हक्क लेखकाच्या स्वाधीन आहे, कोणाला जर चित्रपट, मालिका, लघुपट,नाटक,आणि इतर कोणत्याही सोशल गोष्टीसाठी करायचं असल्यासं लेखकाची पुर्वपरवांगी घेणे बंधनकारक आहे तसे नाही केल्यास कायदेशीर कारवाई केली जाईल..
  

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

कस असत हे नातं

लेख:-शहरातलं सोनं.....

तिच्यासाठीच्या कविता.......