लेख:- हरवलेलं पत्र सापडलं....
लेख:- हरवलेलं पत्र सापडलं....! ऐवढी शोधा शोध करून शेवटी ते हरवलेलं पत्र सापडलं..अहो मग काय सांगू ते पत्र सापडतं नव्हतं म्हणून किती अस्वस्थ झालेलो मी काही विचारू नका…त्यासाठी ऐवढी शोधा शोधा करावी लागली,ते म्हणतात ना शोधल कि सापडतं…म्हणून जरा शोधाण्याचा प्रयत्न केला तर ते पत्र कुठे सापडावं माझ्याचं एका वहित..आता तुम्हाला सगळ्यांना नक्की हा प्रश्न पडला असेलं त्या पत्रात नेमक असं काय होत,कि मी त्याच्या साठी खुप अस्वस्थ झालेलो..तसं सांगायचं झालं तर,त्या पत्रात ना माझं बालपणं आहे, माझ्या माणसांच्या काही आठवणी त्या पत्रात आहे..मला चांगल वाटतं त्यातलं एखादं पत्र मी आईसाठी लिहिलेलं,पाचवीत असेल मी मातृदिना निमित्त.. पत्रात काही खास नव्हतं,तेच दररोज दैनंदिन काम करतो ते लिहिलं..म्हणजे मी शाळेत कसा अभ्यास केला..? शाळेत कोणता तासं होता..आणि शाळेत युनिटटेस्टचे पेपर दाखवले त्याबद्दल.. जे लिहिलं ते मनापासून आणि पहिल्यांदा आईसाठी पत्र लिहिलं,अगदी भावना जपणारं..म्हणून तर हे सगळी पत्र जरा माझ्या डोळ्यासमोरून नाहिशी झाली कि,लगेच अस्व...