लेख:- हरवलेलं पत्र सापडलं....

               लेख:- हरवलेलं पत्र सापडलं....!

  ऐवढी शोधा शोध करून शेवटी ते हरवलेलं पत्र सापडलं..अहो मग काय सांगू ते पत्र सापडतं नव्हतं म्हणून किती अस्वस्थ झालेलो मी काही विचारू नका…त्यासाठी ऐवढी शोधा शोधा करावी लागली,ते म्हणतात ना शोधल कि सापडतं…म्हणून जरा शोधाण्याचा प्रयत्न केला तर ते पत्र कुठे सापडावं माझ्याचं एका वहित..आता तुम्हाला सगळ्यांना नक्की हा प्रश्न पडला असेलं त्या पत्रात नेमक असं काय होत,कि मी त्याच्या साठी खुप अस्वस्थ झालेलो..तसं सांगायचं झालं तर,त्या पत्रात ना माझं बालपणं आहे, माझ्या माणसांच्या काही आठवणी त्या पत्रात आहे..मला चांगल वाटतं त्यातलं एखादं पत्र मी आईसाठी लिहिलेलं,पाचवीत असेल मी मातृदिना निमित्त.. पत्रात काही खास नव्हतं,तेच दररोज दैनंदिन काम करतो ते लिहिलं..म्हणजे मी शाळेत कसा अभ्यास केला..? शाळेत कोणता तासं होता..आणि शाळेत युनिटटेस्टचे पेपर दाखवले त्याबद्दल.. जे लिहिलं ते मनापासून आणि पहिल्यांदा आईसाठी पत्र लिहिलं,अगदी भावना जपणारं..म्हणून तर हे सगळी पत्र जरा माझ्या डोळ्यासमोरून नाहिशी झाली कि,लगेच अस्वस्थ होतं.आणि आज अस्वस्थ  होण्याचं हेच कारण होत..कारण माझ्या भावनाच सापडतचं नव्हत्या ना,सगळ्या त्या काळोख्या अंधारात लुप्त झालेल्या.. म्हणून मी खुप कासावीस होतो,त्याभावानासाठी  व्हाटसप्प,फेसबुक,इंनस्टाग्राम इथे असतात वो भावना पण त्या भावनांना काहीचं अर्थ नाही..नुसतचं सगळं  feeling sad,happy, positive यामध्येच सगळचं अडकून राहिलं..तसं बघायला गेलं तर आपण आपल्या भावनाचं हरवल्या आता त्या शोधायचं म्हणटलं कि सापडतचं नाही.. म्हणून तर या लॉकडाऊन सारखा वेळ आयता चालून आल्यावर मी ति संधी सोडणार नाही म्हणजे नाही.. तसं मी माझ्या भावना असचं शोधतं राहणार बघुया भावना कुठे सापडतात का ते बघुया…
     म्हणून तर मी सगळं घर पालतं घालतं,कुठे  बाहेर भावना सापडतात का ते बघीतलं…तरीही कुठेचं सापडतं नव्हतं,माझ्या कपाटतले,बँगेतलं सगळं तपासून पाहिलं मग कुठेचं ते पत्र सापडलं नाही…उगाच रडकुंडीला माझा चेहरा झालेला कि ते पत्र का नाही सापडलं,तरीही मी शोधतचं होतो आणि शेवटी माझ्या वहितचं सापडलं ते पत्र..खरतर ति वहीपण माझी शाळेची निंबधाची होती,पुन्हा एकदा अजूनही आठवणी जाग्या झाल्या ते साधं कळालं पण नाही.. त्यावेळी लिहिलेले अनेक विषयांवरचे निंबध वाचताना माझं मला हसू आलं,कारण लहानवयात लिहिलेला,माझा आवडता प्राणी,पक्षी..माझे आर्दश,पावसाचा निंबध,माझे आजी आजोबा,आईबाबा,दादाताई या सगळ्या निंबधामध्ये कुठेही छापून काढलं असं नव्हतं त्यासगळ्यामध्ये भावना होत्या फक्त अगदी मनापासून लिहिलेल्या.. ते पत्र तर मिळालं पण त्यातून अनेकवर्षांनचा आठवणीचा खजिना मिळाला..त्यापत्राबरोबर अनेक पत्र शेवटी मिळाली,आईने बाबांनसाठी लिहिलेली,आजोबांनी बाबांनसाठी लिहिलेली काकाची,मावशीची,मामाची तशी सगळ्यांनची पत्र या निर्मिताने वाचायला मिळाली..खुप भर वाटलं इतक्या दिवस काही गोष्टी गमवलेल्या त्या परत मिळाल्या…खरतर मला एक असा प्रश्न पडतो हल्ली कोणचं कसं पत्र लिहितं नाही.. पत्र लिहितांना फक्त कोणाच्या मयताचं..पण जिंवतपणी कोणालाचं साध त्याची विचारपूस करावी वाटतं नाही, फक्त सोशलमिडियावर वरवरच बोलतं असतात सगळे…पण कोणालाचं वाटतं नाही आपल्या भावना  जगाव्या…हे पत्र वाचलं आणि मला पुन्हा एकदा पत्र लिहिण्याचं मन केलं,आपल्या खऱ्या भावना जपण्याचं जणू मला खुळचं लागलं…
       मी सहजचं पण पुन्हा एकदा पत्र लिहिण्याचं प्रयत्न केला,माझ्या प्रियजणांना,अगदी मनापासून सगळकाही लिहिलेलं त्या पत्रात…
           प्रिय सर्वजणं….
      पत्र लिहिण्यास कारण कि,खरतर कितीतरी दिवसांनी आज हे पत्र लिहिण्याचा योग आला,नायतर नुसत सोशल मिडियावर एकमेकांनचे पोस्ट लाईक्स कंमेट देऊन त्या सगळ्या भावना कुजुन ठेवण्यापेक्षा वाटलं पत्र लिहुन त्या भावना तरी जगवूया…म्हणून हे पत्र   लिहिलं..तसं सगळ्यांना आता भरपूर वेळचं वेळ मिळालं असेलं,वाटलं पण नव्हतं आपल्या देशात असा एक व्हायरस येईल,आणि सगळचं बंद पाडेलं चक्क या व्हायरस ने देवाला पण मागे टाकलं आणि त्याची अनेक मंदिरे बंद केली,काही माणसांना आपल्या मातीची,आपल्या घराची ओढ मनामध्ये लावून दिली…तरीही आपण जास्तकाळ हा सोशल मिडियावर व्यक्त करतो,म्हणजे एकंदरीत काय त्या भावना सगळ्या खोट्या..त्यातही ऑनलाइन शिक्षण  विद्यार्थ्यांनच्या माथीमारून  त्यांचं डोक फार गोंधळून सोडतो…जिथे मुलांना आधीच पुस्तकांची गोडी नाही, तिथे ऑनलाइन पुस्तक  देऊन नव्या कोऱ्या पुस्तकांचा सुवास पण कोणत्याचं मुलांना जाणवतं नाही…म्हणून म्हटलं जरा लिहावं हे पत्र आपल्या हरवलेल्या भावनानं बद्दल…काही शब्द असतातचं असे जे मनाला एकत्र करतात,तेच शब्द मी परत आण्याचा प्रयत्न करतो..कारण मला हे पत्र माझ्या प्रियजणांना पर्यंत न्हायचं..त्यांना भावनाबरोबर पुन्हा एकदा गाठी भेटी करून द्यायचं..खरचं सगळ्यांना एकचं सांगणं आहे, भावना जपा सोशलमिडियाच्या जगात भावनाना ओस पाडु ना..भावना जपा,माणसं जपा आणि पुन्हा एकदा नात्यातला ओलवा परत आणा….तर ऐवढ बोलून  हे पत्र इथेचं संपवतो..कारण आता अजून बऱ्याचं गोष्टींन मधुन भावना जपायच्या…माणसं आहे म्हणून सगळं जग असतं….त्याचं माणसांना जपूया….

                तुमचाचं एक प्रियजणं….
    आणि पुन्हा एकदा मी पत्र मी लिहिलं,हरवलेल्या भावनाना पुन्हा एकदा शोधून काढलं.जुन्या नव्या गोष्टीने मन पुन्हा रिफ्रेश केलं,पुन्हा पुन्हा मनाला मात्र सारखं हसवलं……!
                                         लेखन:- अभय घाटगे.© 
  
   

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

कस असत हे नातं

लेख:-शहरातलं सोनं.....

तिच्यासाठीच्या कविता.......