पोस्ट्स

ऑगस्ट, २०२२ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

लेख:-शहरातलं सोनं.....

इमेज
लेख:- शहरातलं सोनं...... प्रत्येक माणसांच काही ना काही स्वप्नं असतं,तसं  माझं आहे, शहरात आपलं स्व:ताचं घर घ्यावं...खरतर हे स्वप्नं माझ्या आईचं,तिने कित्येक वर्षे वडिलांच्या पोलिसांच्या नोकरीमुळे शहरात काढली,तिलाही वाटायचं आपलं असं स्व:ताचं घर असावं,पण इतर माणसांचा  गोतावळा सांभळण्यात तिचं सगळचं आयुष्य खर्ची गेलं,खरतर माझ्या आई वडिलांना माणसं जपण्याचा जोडण्याचा लय नाद त्यांनी खुप माणसं जोडली तशी,आमच्या पोलिस लाईन मध्ये तर माझ्या आईने बरीचं माणसं जोडलेली,सगळीचं माझ्या  आईला "वहिनी वहिनी.."करत हक्काने काहीही खायायला मागायची..आणि माझी आई नि:श्वोक पणे करुन खायायला घालायची...खरतर तिने आणि वडिलांनी शहरात हेचं तर सोन कमावलेलं,माणसाचं  सोनं ते त्यांना खुपचं मिळालं..पण माझ्या आईचं शहरात घर घेण्याचं स्वप्नंचं दुरावलं,का विचारला..? कारण आमच्या घरात चुलत काका,आत्या ,आत्याची मुलं आत्याचा नवरा,आमच्या गावतल्या भावकीमधले काहीजण तसे या सगळ्याचा गोतावळा माझ्या आईने सांभळा तिने वडिलांना जवळ कसला एक ही शब्द काढला नाही....सगळ्यानसाठी ती कायम झटत राहिली,सगळ्याचं सगळकाही करत राह...