लेख:-शहरातलं सोनं.....
लेख:- शहरातलं सोनं......
प्रत्येक माणसांच काही ना काही स्वप्नं असतं,तसं माझं आहे, शहरात आपलं स्व:ताचं घर घ्यावं...खरतर हे स्वप्नं माझ्या आईचं,तिने कित्येक वर्षे वडिलांच्या पोलिसांच्या नोकरीमुळे शहरात काढली,तिलाही वाटायचं आपलं असं स्व:ताचं घर असावं,पण इतर माणसांचा गोतावळा सांभळण्यात तिचं सगळचं आयुष्य खर्ची गेलं,खरतर माझ्या आई वडिलांना माणसं जपण्याचा जोडण्याचा लय नाद त्यांनी खुप माणसं जोडली तशी,आमच्या पोलिस लाईन मध्ये तर माझ्या आईने बरीचं माणसं जोडलेली,सगळीचं माझ्या आईला "वहिनी वहिनी.."करत हक्काने काहीही खायायला मागायची..आणि माझी आई नि:श्वोक पणे करुन खायायला घालायची...खरतर तिने आणि वडिलांनी शहरात हेचं तर सोन कमावलेलं,माणसाचं सोनं ते त्यांना खुपचं मिळालं..पण माझ्या आईचं शहरात घर घेण्याचं स्वप्नंचं दुरावलं,का विचारला..? कारण आमच्या घरात चुलत काका,आत्या ,आत्याची मुलं आत्याचा नवरा,आमच्या गावतल्या भावकीमधले काहीजण तसे या सगळ्याचा गोतावळा माझ्या आईने सांभळा तिने वडिलांना जवळ कसला एक ही शब्द काढला नाही....सगळ्यानसाठी ती कायम झटत राहिली,सगळ्याचं सगळकाही करत राहिली.पण स्व:ताचं स्वप्नं मात्र स्वप्नं ठेवलं तिने...माझ्या वडिलांची तशी साथ होती तिला,पण या सगळ्या गोतावळ्यामुळे त्यांनीही सगळ्या स्वप्नांवर पाणी सोडलं...आणि वडिलं जसे रिटायर्ड झाले तशी माझी आई पण शहर सोडून गावी राहायला गेली....पण आज तिचं सगळीचं माणसं माझ्या आईने त्याच्यासाठी जे काही केलेलं आहे तेच विसरली,तिचं स्व:ताचं स्वप्नं तसचं अर्धवट ठेवलं या माणसांनसाठी आणि यामधल्या काही माणसांनी आपली नियत फिरवली,माझ्याचं आई वडिलांनाच्या विरोधात गेले...खरतर मला याचं गोष्टीच वाईट वाटतं,माझ्या आईचं स्वप्नं कधीचं पुर्ण होऊ शकलं नाही... आमचं शहरातलं सोनं कुणीतरी चोरलं असं वाटतं होतं,का अशी वागली सगळी काका ,मामा सगळेचं..?? स्व:ताचा खिसा यांच्या जिवावर भरला आणि यांना कायमचं दुर केलं..कशासाठी पण..? याचं उत्तर कदाचित त्यांच्या जवळ पण आज नसेलं..कारण त्यांना पण स्व:ताची लाज वाटतं असेलं,आपण दुसऱ्याच्या जिवावर मोठे झालो,आपली स्वप्नं त्याच्याजिवावर राहुन पुर्ण केली...पण त्याच्या स्वप्नांच काय..? याचा कुणीचं विचार केला नाही, आज माझी आई गेल्यावरही त्यातलेचं काही इतके लालची हावरट होते ना,आमचं सगळचं गिळण्यासाठी करण्यासाठी बसलेलं..ऐवढी बदलत्या काळात वाईट आणि क्रुर माणसं असतात का या जगात..? पण मी मात्र आईचं स्वप्नं पुर्ण करणार,"शहरातलं सोन" घ्यायचं..म्हणजे आपलं असं स्व:ताचं घर घ्यायचं,जे आपलं असेलं,माझ्या आईचं असेलं असं स्वःताचं घर घ्यायचं...कारण स्वप्नं कितीही मोठी असली तरीही ति पुर्ण करण्यासाठी आपल्या आईचा आर्शिवाद लागतो,आणि हे स्वप्नं आणि माझी इतर सगळी मोठी स्वप्नं पुर्ण करण्यासाठी आईचा आर्शिवाद नक्की असेलं....कारण ती माझी सावली बनून माझ्या प्रत्येक गोष्टीकडे लक्ष ठेऊन असणार,ती माझा आधार बनवुन मला स्वप्नं पुर्ण करण्यासाठी नव्याने बळ देत राहणार....
खरतर हेचं आईचं स्वप्नं आहे, "शहरातं सोनं." घ्यायचं,आपलं असं आपल्याला मायेने जपणारं,हक्काने कुशीत घेणारं एक घर घ्यायचं..तिचं हेचं स्वप्नं मी पुर्ण करणारं आणि तिला खऱ्या अर्थाने आनंद आणि अभिमान वाटेलं असं काहीतरी आयुष्यात नक्कीचं करणारं.....!
लेखन:- अभय घाटगे.©
टिप्पण्या