प्रिय बाबा..
पत्र:- प्रिय बाबा... खर तर नेमक कोणाला पत्र लिहु तेच कळतं नाही,कधी वाटतं पप्पा,डँड,फादर ,कि बाबा यांना लिहु का..? पण या गोष्टीत खुपचं गोंधळ उडालेला आहे, जसा माणसांन माणसांन मध्ये होतो ना अगदी तसा...तरीपण मी बाबांनाच लिहितो पत्र,कारण बाबा या शब्दातं जितकी आपुलकी, प्रेम माया,सगळ सामावलं आहे ना,तुरतास बाबांनाच लिहितो आज मी हे पत्र...तर पत्र लिहिण्यास कारण कि,कुठुन आणि कशी सुरूवात करू तेच कळत नाही बाबा....खुप बोलायचं होतं पण काळ जसजसा बदला तसं ते बोलनं राहुनचं गेलं...पण आज बोलणार हा बाबा,खुप बोलणार या पत्रामधुन...कारण मी लहान होता तेव्हा तु घरात कुठे असायचा,सतत 24 तास ड्युटी वर असायचं,तुला तेव्हा संपूर्ण मुंबईच्या रक्षणाचा विचार होता ना..मग घरी यायाला कसं मिळायचं तुला...पण एकंदरीत ते बरोबर आहे म्हणा,कारण खुप मध्यरात्री जेव्हा सगळी झोपली असतात,तेव्हा संपूर्ण रात्र जागुनं पोलिसंच पहारा देता ना...पण असु दे आम्हाला अभिमान आहे कि आमचा बाबा...