प्रिय बाबा..
पत्र:-प्रिय बाबा...
खर तर नेमक कोणाला पत्र लिहु तेच कळतं नाही,कधी वाटतं पप्पा,डँड,फादर ,कि बाबा यांना लिहु का..? पण या गोष्टीत खुपचं गोंधळ उडालेला आहे, जसा माणसांन माणसांन मध्ये होतो ना अगदी तसा...तरीपण मी बाबांनाच लिहितो पत्र,कारण बाबा या शब्दातं जितकी आपुलकी, प्रेम माया,सगळ सामावलं आहे ना,तुरतास बाबांनाच लिहितो आज मी हे पत्र...तर पत्र लिहिण्यास कारण कि,कुठुन आणि कशी सुरूवात करू तेच कळत नाही बाबा....खुप बोलायचं होतं पण काळ जसजसा बदला तसं ते बोलनं राहुनचं गेलं...पण आज बोलणार हा बाबा,खुप बोलणार या पत्रामधुन...कारण मी लहान होता तेव्हा तु घरात कुठे असायचा,सतत 24 तास ड्युटी वर असायचं,तुला तेव्हा संपूर्ण मुंबईच्या रक्षणाचा विचार होता ना..मग घरी यायाला कसं मिळायचं तुला...पण एकंदरीत ते बरोबर आहे म्हणा,कारण खुप मध्यरात्री जेव्हा सगळी झोपली असतात,तेव्हा संपूर्ण रात्र जागुनं पोलिसंच पहारा देता ना...पण असु दे आम्हाला अभिमान आहे कि आमचा बाबा पोलिस आहे त्याचा.....तर आता मुद्याचं बोलु या...तर तु होतास म्हणून मला Nsd नँशनल स्कुल ऑफ ड्रामा..मध्ये पाठवण्यासाठी तयार झाला,खर तर आईची इच्छा नव्हतीच मी तिथे जावं,पण तु आयत्यावेळी सगळ सामावुन घेतलं...आईला सतत वाटत दुसऱ्या लोकांच्या पोरांच बघुन,कि हा मुलगा परदेशातुन जाऊन आला...आपली मुल का नाही जात,म्हणून तिची सारखी चिड चिड असते,पण बाबा मला नाही जायचं परदेशात, मला आपल्या भारतात राहुनचं सगळ्यागोष्टी करायच्या...आणि आजकाल भारतात राहुन सगळ्या गोष्टी करायची लाज वाटते हल्लीच्या पोरांना,म्हणून परदेशात जातात तिथेच सेटल होतात..आणि सगळ्या
आईवडीलांन च्या सामाजिक नाटकात जस घडतं तसचं होतं मग..पण बाबा मी तसा नाही आहे.. मला भारतात राहुन सगळ्या गोष्टी करायच्या...म्हणून तर Nsd ला admission घेतलं ना..पण बाबा हे तुझ्यामुळे शक्य झालं हे,अगदी मला आठवतंय माझं बालपण, तुला सुट्टी होती ऐकी दिवशी,तेव्हा तु आम्हाला सगळ्या ना घेऊन फिरायला गेला,राणीच्या बागेत,तेव्हा तिथे तु पिजऱ्यामधल्या सिंहाला पाहुन काय म्हणाला,"कधीपण आपण सिंहासारख राहयचं,ताटमानाने..कुणी काहीही बोलु दे ,चूका काढु,आपण लक्ष द्यायचं नाही आपण फक्त ऐटीत आणि आपल्या रूबाब आपलं काम करायचं...जेव्हा वेळ येईल तो बरोबर त्या सिहांसारखी डरकाळी फोडायची कि तो चुका काढणार पण गप्प राहिलं...." खरच तुझे हेच विचार आज माझ्या क्षेत्रात उपयोग ला येतात...माझ्या क्षेत्रात, खर तर बाबा माझ स्वप्न आहे रंगभुमीवरचा अभिनेता बनायचा...खुप नाटक,एकांकिका ,या गोष्टी पुन्हा करायच्या..आयुष्यात काहीतरी मिळवायचं या रंगभुमीची सेवा करताना,ते म्हणजे मायबाप प्रेक्षकांनच्या हजारो टाळ्या... हेच मोठ यश त्या रंगभुमीवरच्या कलाकार च असतं.....आणि मी मिळवणार हे यश माझ्या बाबाचं स्वप्न साकार करणार, कारण तु पण तुझ्या काळी अनेक नाटक बघीतली तुलापण वाटतं असणार ना,नाटक जगावं,कारण नाटक ही जगण्याची गोष्ट आहे..पण तुझ हे स्वप्न मी पुर्ण करणार, समाज्याचा या क्षेत्राबद्दल कायपण विचार असताना सुद्धा.....बाबा येथे दिल्ली मध्ये मी लाला किल्ला,ताजमहाल बघुन आलो..खुपचं भारी आहे हे प्रेक्षणीय स्थळ अगदी तु सगळ्या गोष्टी दिल्ली बद्दल चांगायचा अगदी तसं आहे.. मी चांदणी चौक मध्ये पण गेलो,तिकडची भजी काय भारी लागते...तेव्हा आईच्या हाताच्या भजीची आठवण झाली... काय मस्त लागतात ना,एकेदिवशी आपण दोघांनीच ती भजी फस्त केलेली सगळी...तसा भजी तुझा नी माझा आवडता पदार्थ.. मग काय करणारं......
बाबा खर तर पुढे बोलायला माझे शब्दचं अपुरे पडतातं...जस माणसं हल्ली एकमेकांनपासुन दुर जातात ना अगदी तस झालं बघ...कधी आपण आपल्या बाबा बरोबर निट समोरा समोर बोललो नाही, फक्त मोबाईल प्रत्येकाला लागेलं व्यसन यावरुनच बोलायचं...पण नेमक काय बोलु या शब्दांमध्ये गोंधळ व्हायचं..असं फक्त बापमुलांच्या वेळी का होतो ओ..बाबा,का बापाबरोबरचा हल्ली प्रत्येक मुलाचा संवाद च हरवला...?नाही पण मी बोलणार मला बोलायचं....बाबा आज तु पण तुझ्या बाबांना miss करत अशील ना,जेव्हा हयात होते आजोबा, तेव्हा तुला त्यांच्याबरोबर कधीही संवाद साधता आला नाही, शेवटपर्यंत तु गप्पचं राहिला...आज मलापण तिचं भीती वाटते...कि आपल्या बाबा मध्ये पुर्णपणे संवाद होईल ना,का सोशल मिडियावर सगळे हरवतात तसा हरवून जाईल तो संवाद..... पण मी बोलतो,तुझ्याबरोबर...बाबा मी film मेकिंग मधुनं एक कोर्स केलेला एक वर्षाचा,त्यानंतर त्याचं indarstry मध्ये जॉब केला एकच वर्षे, कारण नाटकाची खाज काही करून उतरत नव्हती ना...पण त्याबद्दल तु आणि आई नाराज अशीलं,कारण मी इतक्या job सोडायला पाहिजे नको होत तुम्हाला, पण काय करू,Nsd जाणं पण तितकचं म्हत्वाचं होतं ना,इतके वर्षे त्या कोर्स मुळे नाटक या गोष्टीपासून दुर राहिलो...पण मन स्वस्थच बसतं नाही... म्हणून मी हा निर्णय घेतला त्यामुळे मला माफ करं...बाबा तुच म्हणतो ना ,कधी कधी,टेन्शन नाही घ्यायचं,मस्त बिनधास्त राहिचं,आणि आयुष्यात आपल्या हवं ते करायचं...तरच खऱ्या अर्थाने आयुष्य जगात येतं... बाबा मग मी माझ्या आयुष्यात मला हवं तेच करतो ना,Nsd नंतर पण खुप planning केले..स्वतः लिहिलं नाटक रंगभुमीवर आणायचं,बाबा त्या नाटकाचा विषय खुप भारी,हसण्याची शोकांतिका दाखवली त्यामध्ये.. आणि नंतर नँशनल फिल्म फेस्टिवल..साठी एक लघुपट तयार करायचा..दरदिवशी वेगवेगळे विचार येतात मनात नवीन नवीन विषयाबद्दल चे...ते लिहुन काढतो मी..कारण तुच शिकवलं ना,आयुष्यत प्रत्येक वेळी वेगवेगळे विचार करायचं मग कळतं आपल्याला जिवनात किती वळणं असतातं.....बाबा अगदी वाटतं होतं मला माझ स्वप्न मलाच साकार करायचं,अगदी वाटते कितीही खड्डे आले तरही...फक्त तुझी साथ हवी,आणि आईची..या वाटेवरून चालताना,कारण सिनेमा,नाटक जगात जायला लय खडतर रस्ते येतात,पण त्या रस्त्यावरून जाताना तुमची साथ पाहिजे मला सावरायला......! बाबा एक कविता लिहु वाटली,खरतर कविता लिहायला आत्ताचं सुरुवात केली तरी बघा वाचुन...
बाबा..कधीतरी न बोलताच मनातल्या मनात बोलणारा..तर जणु शब्दचं नाही आहे म्हणून गप्प बसणारा बाबा....
केव्हातरी उगाच ड्युटी वरून उशिरा येणारा तु बाबा..तर उशिरा येऊन हळुच आमची चौकशी आईजवळ करणार तु आमचा बाबा....
तुला क्षणात सर्वकाही सांगण्याचा मोह होतो,पण तु तुझ्याबरोबर बोलायला शब्दचं येतं नाही वेळवर...
असा तु बाबा,पण आम्हाला कधीच कळला नाही तुच आमचा एकुलता एक डँडा...अगदी तुझ्याबरोबर बोलायचं मन करतं आणि तु बोलल्यावर सारकाही गोंधळ दुर होतो...
बाबा...आमच्या वेळनसुन ही गुपचूप माय करतो तो आमचा पिता...बाबा अगदी अचानक तुझ्या बद्दल काव्य सुचतय असा आमचा गोडगोड अगदी साजुकतुपातल्या शिरा सारखा बाबा....
बाबा कशी वाटली कविता ते कळवं,कारण पहिल्यांदा लिहिली ना,म्हणुन,खरतर ती कविता पण वाटेल आणि मुक्तसंवाद पण वाटेलं...कारण पहिल्यांदा मी बाप मुलांवर कविता लिहिली ना....बाबा आईला पण निरोप दे तिला म्हणावं काळजी घे स्वतः ची.....आणि बाबा तु पण काळजी घे..ते ड्रिंक्स वगैरे घेण कमी करं..एकदा माहिते ना काय झालेलं आता तिचं चुक करू नको..तु म्हणतो ना माणुसं आपल्या केलल्या चुकांनमधुन सुधारतो,आणि तुच परत तिच चुक करतो...ड्रिंक्स घेऊन काही प्रश्न सुटतं नाही, ते फक्त माणसांन बरोबर मनमोकळ्यापणाने बोललं कि सुटतातं...त्यामुळे काळजी घे तु स्वतः ची आणि माझ्या आईची,माझं Nsd मधलं नाट्यप्रशिक्षण घेऊन येईलच मी....तेव्हा मग आपण एकत्र जेवुया..आईच्या हातची बाजरीची भाकरी,आणि मटणाचा रस्सा...अगदी आपल्या घराच्या व्हरांड्यात सगळे एकत्र जेवुया..त्या आकाशतल्या चांदण्याकडे पाहतं....अगदी बाबा लहानपणी व्हरांड्यात गप्पा मारायला बसायचो ना तसं...ताईला वगैरे सगळ्याना बोलवुया तेव्हा..आणि खुपच मज्जा करू.. अजुन बऱ्याच गोष्टी बोलायच्या त्या गोष्टी बोलतं बसुया..चल ऐवढ पत्र लिहुन मी इथेच संपवतो,पण तिथे आल्यावर खुप बोलुया अगदी एखाद्या मित्रासारखं.........!
तुझा लाडका मुलगा
लेखन:- अभय घाटगे.
* सुचना:- सदर पत्राचे सगळे हक्क लेखकाच्या स्वार्धीन आहे..त्यामुळे या पत्राचे कोणत्याही मजुकराचे ,चित्रपट ,नाट्य,मालिका, आणि इतर कोणत्याही गोष्टी साठी चित्रित करायचा असेल तर लेखकाची पुर्व परवानगी घेणे बंधनकारक आहे तसे केले नाही कायदेशीर कारवाई केली जाईल..
टिप्पण्या