प्रिय सनि लियोनी ताईस..

                                    
                                                      प्रिय सनि लियोनी ताईसं.....
                                        
            पत्र लिव्हण्यास कारण कि,खर तर तुम्हांशी हे पत्र लिव्हताना मला काय लिहाव सुचत नाय हाय,परंतु तुम्हांशी हे पत्र कळेल का आणं सर्वात म्हत्वाचं म्हणजे तुम्हांशी ते वाचायंला सवड घावल का,का कुणासं ठाऊक,पण नाय म्या हे पत्र लिव्हतो,अहो सनी लियोनी ताई तुम्ही किती ते तोडके कापड घालत व्हं..,आमच्या गावाकडची सगळी पोर कामधंदे सोडुन तुमचे ते फोटो,आनं ते व्हॉट बारीक कापड घातलेले इडिओ बघत बसतात,तुम्हांशी तुमच्या आई-बाचं,भ्या नाही वाटत का,तुम्ही आसली काम करता,तुम्हांशनी तुमचं आई-बा कावत नाही का,आमच्या गावाकडेच्या पोरीचे आई-बा त्यांच्या पोरींने आसल काय केल तर लगेच कावतात,नायतर अख्ख गाव तोंडात श्यांन घालतयं बघा,तस तुमच्या बाबतीत अजिबात नसेल कारण कि, तुम्हांशी तुमचा समाज काय बोलणार.पण आमच्या गावाकडच्या पोरीशंनीच बोलणार,त्या पोरी कुठे तुमच्या सारख्या झकामगा घालतात,जऱी घातल तस तरी अख्ख गाव त्यांना बोलायला मोकळ कि,अशी परिस्थिती गावच्या पोरीच्या बाबतीत का,त्या नाही करु शकत का ते काय असत ते फॅशनं,त्यासनीं असल सगळ करायला नियम माफ नाही पर तुम्हांशंनी हाय...आता तुम्हांशनी सांगतो परवा आमच्या गावच्या एका पोरीने ते र्थी फोर आणं टि-शर्ट घातलेलं तवा सगळा गाव कसा कसा बघत हुंता तिच्याकडे ते सांगायलाचं नगं,अक्षरशा तर तिला आण तिच्या आई-बा ला काय बोलत हुंता तो सारा गाव कि,तुमच्या पोरीनें गावची इज्जत मातीत मिळवली अस काहीबाही,आत्ता मला हेच कळत नाय बघा कि,गावाची इज्जत मातीत घालवली म्हणजे नेमक अस काय केल व्हं तिने..तिने फक्त र्थी-फोर,आनं ते टिशर्ट घातल म्हणुनं आता मला सांगा कि,तिला पण वाटत असणार ना,आपनं पन ते फॅशन करावी......अस का पर सनी लियोनी ताई म्हणजे त्यां पोरींनी जन्मभर ड्रेस घालायचां का.नाय मला पण हे पटत नाही,म्हणजे तुम्ही हिरोईन हाय म्हणुन तुम्हांशी सगळ माफ आणि तेच जर आमच्या गावाकडच्या पोरींनी केल तर त्यांचनीं कोणतातरी गृन्हा केल्या सारख वागनुक दिली जाते.पर आस का व्हं,तेच कळत नाही,म्हणजे गावकडंच्या मुलींनी साडी,ड्रेसच घालायचा का कधी ते जिंन्सची पॅन्ट,ते र्थी फोर नाय घालायचं काय...त्याचनीं पण मन नावाची गोष्ट आसल नव्ह का,तेच मन कोणचं समजुन घेत नाय बघा...अहो आता परवाची गोष्ट सांगायची आमच्या वाड्यातल्या एका पोरीचं प्रेम जुळल बघा,त्या खालच्या वाड्यातल्या चांभाराच्या पोरांशी,तर वाड्यातल्या समध्या लोकांनी नाव ठेवल बघा,त्या पोरींशी आनं तिच्या आई-बाशनीं.काय एक एक लोक असतात बघा,म्हणजे तोकडे कपाड घालायची नाय,आनं प्रेमात भी पडायचं नाय,आसले कसले इचार त्या समद्या लोकांचे, हे गाव यांच्यासारख्या शिकशित तरुणीनं मुळ मोठ व्हणारं हाय...आनं तुम्हाशी एक सांगतो बघा माझी बायको पण अशीच शिकलेली हाय,शहरातली ती हाय ना ,तिला पण कधी कधी वाटत ते जिन्स-पॅन्ट,र्थी-फोर घालावी,पण माझे आई-बा बोलतात,काय गरज हाय असल घालायची,हे शहर नाय हाय गाव हाय गाव,येथे आसल काय पोरीनी,आनं सुनांनी घातली कि आख्ख गाव तोंडात श्यान घातया,आता तुम्हीचं सांगा ती हाय शहरातली तिला कस जमेल सारख साडीवर राहन आणि चौवीसतास डोक्यावर पदुर ठेवनं,तिला वाटत असणार ना,कि आपण पनं फॅशन करावी,हेच त्या गावच्या समाज्याचं चुकतय बघा...पर तुम्हांशनी पनं एक इनती करायची बघा,तुम्हीं पनं कधीतरी साडी घाला कि,तुम्हांशनी भी कळायला पाहिजे महाष्ट्रातील गावातल्या स्त्रियाचं दुखनं....

आता मला कळत नाय बघा कि,गावची लोक अजुन पण जुन्याचं इचारांनी का जगात तेच कळत नाही,म्हणजे बघा कोणत्याही बाईने पदुरं डोक्यावरचं ठेवायचा,कोणत्याही स्त्रिनें पुरुष म्हणलं तस वागायचं हेच त्या गावातल्या समद्या जणानां कळत,पण आता काळ बदलला नव्हं का,त्या काळाप्रमाणे का नाही वागत ही समदी लोक,अहो सनी लियोनी ताईसं हा गावडकडचां हा समाज अजुन भी बायकांना कमनिशीबी समजतो,स्त्रिया आजकाल चंद्रावर जाऊ लागल्या,शिनिमात काम करु लागल्या पण आमचा गाव मात्र त्याचं स्त्रियांना चुकीची वागनुक देतो,मला तेच कळत नाय बघा ही माणसं आसं कस वागु शकतात या स्त्रियांवर आजुनं भी...अहो ताई आता काय सांगायच या समध्या लोकांना त्यांचा अज्ञान नडत आजकाल बघा,जो तो स्वाताच्या मर्जी प्रमाणे वागु वागला,२१ व्या शतकात पण स्त्रियांवर बलात्कार असे मानसिक आणि शाररिक अत्याचार होतात बघा तरी,आनं आमच्या गावाकडच्या स्त्रियाच्या बाबतीत एकशे टक्का होत बघा आस काही...मागच्या आठवड्यातली एक गोष्टी तुम्हांशी सागतो,आमच्या गावची संगी...संगिता हि तिच्या सासरवरुन कायमची आली माहेरला,दोन मुलीना  घेऊन,कारण फक्त ऐवढ होत कि,तिच्या सासरकडच्यांना मुली नगं होत्या,त्यांना वंशाचा दिवा पाहिजे होता,पण तिला दोन्ही येळा भी पोरीचं झाल्या..त्यामुळे त्यांसनी हे आवडल नाही म्हणुन तिला माहेरला धाडली,कशी असतात नव्हं का माणसं सनी लियोनी ताई...म्हणजे यांना वंशाचा दिवा पाहिजे,पण तिचं वशांची पंती नको..अजुनही समदी लोक त्याचं इचारांनी जगात कि घराण्याची परंपरा चालवायला एक वंशांचा दिवाचा पाहिजे.....तर आसु द्या सनी लियोनी ताई,पर तुम्हांशी एक इनती करायची आता नका करु आसली काम,तुमच्या शरीराचं प्रर्दशन आसं सगळ्यांन मध्ये मांडु नगां व्हं,एकदा या आमच्या गावकडच्या पोरींनकडे,आन बायकांनकडे बघा,त्याचं खऱ्या अर्थाने आपल्या देशातल्या भारतीय नारी शोभतात...पर तुम्ही नाय बघा,कारण तुम्हांशी सगळा समाज एक सेक्सी गर्ल या नावानेचं ओळखतो,पर आतं हे थांबवा आनं आमच्या महाष्ट्रातल्या स्त्रियांनसारखी नवारी,कास्टी,चोळी घाला कि...त्यामध्ये तुमचं रुप आनंखीन खुलुन दिसेल बघा...

  अहो सनी लिओनी ताई,तुमच्या बद्दल एक गोष्ट कळाली कि,तुम्ही एका मुलाला दत्तक घेतल खुप बर वाटल बघा लय कारण मुल दत्तक घेऊन तुम्ही त्या पोरानंशी एक माय मिळवुन दिली..हि गोष्ट खरी कौतुकास्पद हाय बघा..नायतर आपल्या या समाज्यात दत्तक मुल नगं बघा कोणला,परं तुम्ही त्यांसनी दाखुन दिल,कि एका अनाथ मुलाला आपल करण त्याच्यावर लय माया करण...हि गोष्ट खर तर अवघड हाय बघा,पनं तुम्ही तिचं गोष्ट सोप्पी करुन दाखवली,एका मुलाला दत्तक घेऊन त्याला एक कुटुंब दिल हि लय मोठी गोष्ट हाय...आतापर्यंत हि समदी लोक तुम्हाला सेक्सी गर्ल म्हणुनं चर्चा करत होते,पण आत्ता त्याचं समद्या जणांचे डोळे उघडलेली असतील,कोण कसं हाय शरीराला वरुन थोडीचं समजणार,एखाद्या बद्दल असा गैसमज करण होतो बघा,कोणती स्त्री आपल्या शरीराचं उगाच प्रदर्शन मांडत नाय,तिचं काम फक्त करत असते..पन आता तुमच्याकडे लोकांचा पाहण्याचा दुष्टीकोन नक्की बदलेल,कारण तुम्ही एका अनाथ मुलाला दत्तक घेऊन माणुसकीची व्याख्याचं मांडली जणु...............!
चला ऐवढ बोलुन हे पत्र  लिहियचं थांबतो,आनं तुम्ही एकदा तरी मराठी चित्रपटातली लावणी करा हिच इच्छा तेवढी...........
                                                           तुमचा एक हितचिंतक...
                                
  लेखकः- अभय घाटगे

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

कस असत हे नातं

लेख:-शहरातलं सोनं.....

तिच्यासाठीच्या कविता.......