तिच्यासाठीच्या कविता भाग:-२

                      तिच्यासाठीच्या कविता..
                                                                                          
                          Feeling शेवटी तिला माझ्या कवितेतले शब्द कळालेचं नाही......                                                          
                                                                                             
                            भागः- २

प्रेम ही अशी गोष्ट आहे,ती सारख  आपल्याला कविता करायला भाग पाडते,हे अस खरचं होत का काय माहिते कारण मी लिहिलेली कविता तिच्यासाठी अजुन अर्धवटचं आहे.कारण त्या कवितेमधले शब्द अजुनही कोऱ्याकागदावर उमटलेचं नाही,ती बोलायला तरी यायला पाहिजे तरच ते तिला ते प्रेम आणि ति कविता कळतील ना,कारण तिला पण तेच वाटत प्रेम हे बाह्यआर्वतन दाखवण्याचं नात आहे,ते फक्त सेक्स (संभोग) साठीचं उपयोगाचं आहे.कारण तिच्यासाठी केलेली ति कविताच अशी अर्धवट राहिली,किती स्वप्न रंगवलेली मी,पण त्या स्वप्नांवर मात्र अक्षरशा बलात्कार झाला,खर तर सांगायला नको,पण सांगतो,प्रेमात माणुसं आंधळा होतो ते खर आहे अगदी,त्याला काहीचं सुचत नाही,मग त्या नसलेल्या तिच्यासाठी कविता सुचतात,आणि आपण खुप मोठ्या भम्रांत राहतो कि,तिला एकदा तरी तिच्यासाठी लिहलेली कविता ऐकवायची,पण नंतर खर काय ते कळत ना तेव्हा अक्षरशा आपल्यावर आकश कोसळत,मला नाही होत सांगायला खर तिच्यावर मनापासुन प्रेम मी करायचो पण शेवटी ती माझी नव्हतीचं,मागच्याचं महिन्यातील गोष्ट आहे,मी दादरला माझी रिहसल संपुन घरी जात होतो,तेव्हा मला ती दादरच्या पुलाजवळरुन येताना ती दिसली,पण ती एकटीचं नव्हती,तिच्याबरोबर अजुन कोणतरी एक मुलगा होता,मला कळालचं नाही,ति तिचं होती का,हा अंदाज खरा करण्यासाठी मी तिच्या मागे गेलो,तिला जरासं जवळुन बघीतल तेव्हा कळालं ती तिचं होती,मला काय कराव अक्षरशा सुचलचं नाही,का तिने माझ्या बद्दल न बोलताचं गैरसमज केलेला,का तिला माझ्या बरोबर बोलु वाटल नाही,खरचं तेव्हा अस वाटल प्रेम हे बाह्याआवर्तन करण्याचं नात आहे,त्या प्रेमाला कोणचं सियसली समजुन घेत नाही,ति त्या मुला इतक बोलत होती रस्त्याने सांगायला नको,पण का नाही तिला वाटल कि माझ्याबरोबर एकदा बोलुन तो गैरसमज दुर कराव,ती पण कशी बोलणार,शेवटी अनोळखी होतो ना मी तिच्यासाठी,हल्ली अनोळखी प्रेमात कोणचं पडत नाही,खर तर हिचं एक मोठी रिश्क असते,जर आपण अनोळखी प्रेमात पडलोच नाही तर त्या व्यक्तीला आपण कस समजुन घेणार,कारण आजकाल अरेंज मॅरेज कोण करता ना दिसत नाही,सगळे लव मॅरेजच्याचं फंदात अडकता,पण खर तर अरेंज मॅरेंज मध्ये आपण जेवढ अनोळखी व्यक्तीबरोबर बोलुन,व्यक्त होऊनं त्यांना समजावुन घेऊ शकतो,तेवढ लव मॅरेंज मध्ये दिसुन येत नाही,कारण प्रेमात तेव्हा सगळेचं आंधळे असतात ना,हेच तिचं पण चुकलय,तिला तो कोणातरी तरी मुलगा योग्य वाटला पण मी नाही,का अस त्याच्याकडे पैसा होता म्हणुनं का रोज तिला मॅगडी मध्ये तो नेणार होता म्हणुनं,काय हे आजकालच्या मुलींचं जरा काही बेअक्कल पोर त्यांच्या सौद्याचा खोट बोलुन कौतुक करायला लागली कि त्यांच्या लगेच प्रेमात पडतात,पण त्यामागची त्या पोरांची वाईट ग्रहन वृत्ती दिसत नाही.मला त्यादिवशी कसतरीचं झाल जिवाला,तिच्यासाठी कविता केलेल्या,त्या कोणाला ऐकवु आता अस झाल नुसतयं,खरच “प्रेमात थोडास उशिर लागतो,पण लागतो तर लागतो ऐवढा उशिर लागतो कि, उशिरा का होऊना ते प्रेम मिळतच आपल्याला या आशेवर राहतो आपण...आणि जर नाही मिळाल ना तर खुप त्रास होतोय आपल्याला......!” आणि माझ्या प्रेमात मात्र खुप उशिर झालेला,त्या उशिरामुळे ते प्रेम आता माझ कधीच होणार नव्हतं,मी मुर्खांसारखा तिच्या प्रेमात आंधळा झालेलो,त्या नसलेल्या तिच्यासाठी कविता करायला लागलो,वाटल ती भेटले एक दिवस तेव्हा तिला कविता ऐकवावी,पण कसल काय ती तर भेटली नाही,ती दिसली पण दुसऱ्याचं व्यक्तीबरोबर..............
  
कुठे तरी सारख मनात एकचं प्रश्न येतो कि,प्रेमात पडल्यावर आपल्याला काहीचं कस सुचतं नाही,मला पण हेच झालेल जेव्हा मी तिच्या प्रेमात होतो,सारखे मनात भास होयचे कसलेतरी पण आता कळतय त्याचा काय उपयोग नाही,ते फक्त भासचं होते,खर काही नव्हतं, पण आता आता कळायला लागल कि,हे प्रेमबिम काय नसतं निव्वळ एक टाइमपास असतो,उगाच आपण प्रेमबिम याचां विचार करतो,त्या प्रेमाच्या कविता सतत लिहित असतो,खर तर याचा काहीच उपयोग नाही आजकालच्या जगात मी आधी जे बोलेलो ते बरोबर झाल शेवटी प्रेमाची जागा सध्या सेक्स (संभोग) ने घेतली आहे,आजकाल प्रेम करताना कोण दिसतचं नाही,सगळे सेक्सचं करताना दिसतात,पण अशी प्रेमाची किमंत याच्यामध्ये करतात का,शी चित्रपटात,सिरीयल मध्ये ठिक आहे,पण प्रत्येकक्ष आयुष्यात ही निव्वळ वेड्यांची लक्षण आहे,म्हणुन तर प्रेमात पडल्यावर मुर्ख वेडा होतो माणुसं,खरतर आजकाल लग्नाच्या आधीचं जवळ येऊनं त्या हनिमुनच्या पहिल्या रात्रीची मज्जा घालवतात सगळे,म्हणजे तो हनिमुनचा पहिला स्पर्श,ती पहिली मिठी,या सगळ्या गोष्टी कुठेतरी विसरत चालली आहे लोक,लग्नाआधीच एकमेंकाच्या जास्त जवळ येऊन.......तर सांगायचा मुद्दा असा आहे हल्ली प्रेम कोणचं सिरियसली घेत नाही,सगळे जण निव्वळ टाइमपाससाठी त्या प्रेमाचा उपयोग करतात,कधी कोणही विचारल ना मला तुला गर्लफ्रेंड आहे का......तर त्यांना काय सांगाव याचं विचाराने मनात कसतरी होत,त्यांना काय सांगु मी कि,मला ज्या मुली आवडायच्या त्यांना मात्र माझ प्रेम कधीचं दिसल नाही,ही चुत्यागिरी नाही का,खर तर प्रेमात माणुसं चुत्याचं होतो,तर प्रेम हे एक वेसनं आहे,जस दारु,तंबाखु,सिगरेट गुटखा हे वेसनं लागतात ना तस प्रेम नावाचं वेसनं लागल कि आपल्याला काहीचं सुचतं नाही,सतत त्याचं मुलीचा  विचार करतो,आणि ती जर नाहीचं भेटली,तर खुप अस्वस्थ होत आपण,जस दारु,सिगरेट भेटल नाही तस....काही मुलीचीं जातचं नालायक असते,त्यांना मुलं फक्त एन्जॉमेंन्ट साठी पाहिजे असतात,त्यांच झाल,कि खाऊपिऊन सोडुन देतात,आणि काही मुलांची जात पण कमी नाही काय ती तर पक्की हमरामखोर असतात साली....,त्यांना मुली म्हणजे सेक्स करण्याची वस्तु वाटते,काही मुलांच्या group मध्ये कोणती गोरीपाण मुलगी दिसली कि लगेच तिच्यावरुन मुलामुलांच्यात बोलन सुरु असत,”यार काय माल आहे,मस्त चिकनी आहे रे ,हिला आपल्या group मध्ये join कर ना....” त्यांच्या असल्या बोलन्यानी तर त्याच्या मनात त्या मुली बद्दल कोणती जाग असते ते कळत,ती म्हणजे सेक्स वासनेची.........या अशा मुलांना फक्त मुली म्हणजे सुख घेण्याचं साधनं वाटतात,सुख घेऊन झाल कि,सोडुन देतात त्यांच्या मायला पोरगी म्हणजे सुख घेऊन सोडण्याची गोष्टी वाटली का म्हणजे तिचा कसाही वापर करा,तिच्या भावनांचां अक्षरशा बलात्कार करा, त्याचं काहीचं वाटत नाही या मुलांना..तस सांगायला गेल तर काही मुली पण कमी नसतात,त्या तर कोणता चांगला मुलगा आपल्या सौर्दयांवर कधी भाळतो तेच बघत असतात,एकदा का तो भाळला कि मग त्याला चांगल्याचा कापतात,यागोष्टी बघुन ऐकुन खरचं वैताग आला अक्षरशा म्हणजे खऱ्या प्रेमाला जराही किमत नाही आजकालच्या जगात जो तो प्रेमाला जास्त सिरियसली घेत नाही,काही लोक लिवींग इंन   Relationsip...... मध्ये राहतात,म्हणजे नात काहीकाळ जोडायचं आणि नंतर सोडुन द्यायचं, अरे हे असल कसल प्रेमाचं नातं,कधीही आपण Relationsip मध्ये राहियचं,मला नाही पटत हे खरच अशा गोष्टीनंमुळे ते प्रेम नावाचं नातचं राहिल नाही आजकालच्या जगात..........माझी कविता,माझ्या कविते मधले शब्द ते कधीच कळायले नाही,ती कविता अर्धवटचं राहिली शेवटी कायमची,का त्या पुर्ण होतील कविता,त्या कवितेमधली नायिका जर नायकाची होऊ शकत नाही मग त्या कविता पुर्ण तरी कशा होतील,त्या नसलेल्या नायिकेसारख्या त्या कविता पण नाहिशा होतील ना,यांच गोष्टीने डोक्यात नाही नाही ते प्रश्न येतात,ती प्रश्न या अर्धवट राहिलेल्या कवितेसारखीचं असतात,ती कविता पुर्ण का होऊ शकली नाही,कि त्या कवितेचं काय दोष आहे,कि त्या कवितेमधल्या त्या नायकामध्ये काय दोष आहे असे काहीबाही प्रश्न येतात,पण त्याची उत्तर काय मिळत नाही कितीही विचार केल्यावर,काय कराव ते सुचतं नाही आहे,सतत त्या नसलेल्या तिच्यासाठी कविता सुचायच्या पण आता त्या कवितेचा काहीच उपयोग नाही..त्या कवितेतले शब्द तसेच राहिले अर्धवट कोऱ्याकादावर ते कधीचं पुर्ण होऊ शकणार नाही,कारण प्रेमचं नाही आयुष्यात,तर ते शब्द तरी कसे पुर्ण होतील,ते पण त्या प्रेमासारखे अपुर्णचं राहितील ना.................

           कधी कधी सारख मनात एकचं प्रश्न येतो कि,साला प्रेमात माणसं गोँधळलेली का असतात.आता काल माझ्या एका मित्रांच ब्रेकप झाल त्याच्या गर्लफ्रेंडबरोबर,त्यांचा नात तुटण्याचं साध कारण होत,ति त्याला बोलली कि,तु आता खुप बदलाय,पहिल्यासारखा भेटत नाही,वागत नाही..तिला वेळ देत नाही, या गोष्टींनमुळे तिने त्यांच्या नात्याबद्दल असा गैरसमज केला आणि त्याला सोडुन गेली,हे सगळ असचं चालत का सगळीकडे,तिला का वाटत होत आपल्याला त्याचा जास्त वेळ मिळावा,तो आपल्या सोबत असवा...खर तर त्याला बाकीची पण काम असतात ना,त्या कामांमधुंन त्याला वेळ तरी भेटला पाहिजे,त्याला पण कुंटुंब असत ना..तिथे पण लक्ष देण भाग पडत..पण आजकालच्या काही मुली मात्र खुपचं वेगळ्या असतात,आपल्या बॉयफ्रेंड आपल्याकडे लक्ष द्याव अस त्यांना वाटत,त्यामुळे आजकालच्या समाज्यात एकत्र कुटुंब पद्धती पण दिसुन येत नाही.....प्रेम फक्त शाररिक गरज भागवण्यासाठी आजकालची तरुन मंडळी करतात...काही मुलांच तर मुलींकडे पाहिण्याचा दुष्टीकोनच वेगळा असतो,त्यांच्या मध्ये एकच विचार असतो म्हणजे..अरे भाई..तुला माहित का रे ती आपल्या कॉलनीतील ती पोरगी आहे ना...काय मस्त आहे ना,तिची फिगर काय भारी आहे,एकदम सेक्सी दिसते ती......अशी बोलन मुलांन मध्ये चालु असतं,खर तेव्हा एकच कळत असत मुलांना फिगरवाल्यामुली फक्त उपभोग घेण्याचं साधन वाटतात,हे त्यांच्या बोलण्यावरुन समजत,मग काय उपयोग त्या प्रेमाचा,त्या अनेक कविनी लिहुन ठेवलेल्या प्रेमाच्या कवितेंचा काय उपयोग,म्हणजे मंगेश पाडगावकर,कुसुमार्ग्रज अशा अनेक कविंच्या सगळ्या प्रेमाच्या कविता व्यर्थ आहे आजकाच्या जगात...कारण जिथे माझीचं कविता एका गैसमजामुळे अर्धवट राहते,तिथे या कविंच्यापण कविता अर्धवट राहणार ना,त्यांच्या कवितेमध्ये त्या प्रेमाच वर्णन सुंदर शब्दात केलेल,पण आजकालच्या जगात त्याच्यां प्रेमाच्या कवितेचं वर्णन एका कोमजलेल्या फुलासारख झाल,ना त्या फुलाला पाणी भेटत,ना योग्य ती हवा...त्यांमुळे माझ्या मनात सतत एकचं प्रश्नांनी गोंधळ केला,साला माझी कविता ही अर्धवटचं राहिली,का नाही तिला ती कळाली..तिच्यावर मनापासुन प्रेम करायचो,तिच्यासाठी ती कविता पण लिहियला घेतली..पण त्या कवितेतले शब्द पुर्णचं होत नाही काही केल्या,ते तरी कसे होती,कारण आयुष्यात प्रेम नसल कि त्या कवितेतले शब्द संपुर्ण पणे अर्धवट राहतात...ते पुर्ण होयायला ती कविता तरी कळायला पाहिजे तिला...तिच जर कळाली नाही तर सगळा अनर्थ होईल ना...खर सांगु का प्रेम या दोन शब्दांना या जगात काहीचं किमंत राहिली नाही,सतत प्रेमातील ती ओढ,प्रेमातली ती पहिली भेट,प्रेमातला तो पहिला स्पर्श,आणि प्रेमातल्या त्या कविता या जणु अरबी समृद्राच्या पाण्यात वाहुन गेल्या,त्याच्यातला गोडपण निघुन एक खारट पणा प्रेमात निमार्ण झाला....त्यामुळे माझ्या प्रेमातले ते गोड क्षण,त्या गोड आठवणी त्या सगळ्या, त्या अर्धवट राहिलेल्या कवितेसारख्या अपुर्णचं राहिल्या,त्या कधीच पुर्ण होऊ शकल्या नाही,त्या नसलेल्या तिच्या सारख्याच त्या कविता पण नाहिशा झाल्या............
   
  मला वाटत माझी कविता शेवटी अर्धवटचं राहणार,ति कधीचं पुर्ण होऊ शकणार नाही..यांच विचाराने माझ मन खुप खचतं,अक्षरशा रात्रभर झोप लागत नाही,तसाचं बेडवर निशीप्त पडलो असतो...पण साध डोळ्याला डोळा लागत नाही...सतत एकटक वरच्या छप्पराकडे पाहत बसतो,कारण ज्या कविची कविताचा अर्धवट राहते,तिथे त्याला झोप तरी कशी लागले....पण कसातरी झोपण्याचा प्रयन्त करतो,तेव्हा कशीतरी झोप लागते...पण मनात तोच प्रश्न अर्धवट राहिलेल्या कवितेचा....कि माझी कविता शेवटी तिला कळालीचं नाही.........
                          
                 शेवटी ती एक माझी कविता अजुनही कोऱ्याकागदावर अर्धवटचं राहिली........

लेखनः- अभय घाटगे...                   

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

कस असत हे नातं

लेख:-शहरातलं सोनं.....

तिच्यासाठीच्या कविता.......