असावी एक मैत्रीण

                   असावी एक मैत्रीण...!

        मैत्रीण....... असावी एक मैत्रीण,जराशी गोंडस,creative असणारी एक सखी असावी अस मनोमनी वाटत...तिच creative काम संपुर्ण जगाला आवडेल अस असावं...त्या creative जगात वावरताना ति  कधीच मला  अंतर देणार नाही अशी माझी एक सखी,एक मैत्रीण असावी....तिने मला समजुन घेऊन माझ्या करियर मध्ये साथ करावी...आमची मैत्री अंखड आयुष्यभर  खुप स्पेशल असावी..मैत्रीण असावी एक आपल्याला समजुन घेणारी... खरच आपल्या आयुष्यात अनेकजण येतात पण त्यामध्ये एकच असते ती...आपल्या समजुन घेऊन वेळप्रसंगी मदत करते आपल्या पाठीशी उभी राहते...ती असते फक्त मैत्रीण, सखी...तिलाच आपल्या खुपकाही  गोष्टी सांगाव्या वाटतात आणि तिही तिच्या गोष्टी आपल्याला सांगते...मग  खरच वाटत मैत्रीण असावी तर अशी...सगळ्या नात्यांना एकत्र जोडुन ठेवणारी,नाती जपणारी एक सखी असावी असं वाटतचं..कारण कुणीतरी आपल्या सोबत असल्यावर आपल्याला एकटपणाची जाणीव होत नाही..कारण तेव्हा विश्वास असतो ना आपल्या मैत्रीणीवर...खरच असावी एक मैत्रीण आपली चुक असले तर हक्काने रागवणारी आपली काय चुक झाली ते निट समजुन सांगणारी...मी कधी दु:खी असल्यावर मला जवळ घेऊन माझ दु:ख घालवणारी..पण ती कधी दुखी असलल्यावर मी  मात्र "सोड ना यार chili मार,टेंन्शन  नको घेऊ मी आहे ना तुझ्यासोबत...!" असं मी बोलल्यावर गालावरचा रुसवा विसरून हळुच हसणारी,अशी असावी मैत्रीण..."खरच माणुसं जेव्हा ही अडचणीत पडतो तेव्हा देव येतो असं बोलतात,पण देवाला पण सगळीकडे जाण सोपं नसल्यामुळे त्यांने ति निर्माण केली..ती म्हणजे मैत्रीण, सखी..." आपण कधीही अडचणीत असलो कि ती आपल्यासोबत असतेच असतेच...आपल्याला संकटातुन सावारायला,पण ति जेव्हा संकटात असते तेव्हा आपण कुठे असतो,तर आपण फक्त कुठेतरी लांब पल्हाड  माणसांच्या रानात,वनातल्या गर्दीत भटकत असतो,तेव्हा आपल्याला कळत पण नाही कि आपली सखी,आपली एक मैत्रीण संकटात आहे ते..आपण मात्र माणसांच्या समुहामध्ये ऐवढे गुंग झालो असतो कि तिथे पाहिच राहत..मग कसल्यातरी  किंकाळ्यानी आपल्याला शुद्ध येते त्या शेकडो माणसांच्या समुहामधुन...मग तेव्हा  कळत त्या किंकाळ्या आपल्याच सखीच्या होत्या त्याक्षणी आपण फक्त धावत असतो तिच्यापर्यंत पोहचण्यासाठी पण काही गिधाडे तिला सतवत असतात..तिच्या अंगाला सारखा स्पर्श करत असतात..आणि आपण तिथे पोहचल्यावर ते सगळं बघुन आपल्यालाच स्वाता:ची लाज वाटत असते..कि आपल्याच मैत्रिणीवर अस होतय जिने आपल्या प्रत्येक संकटात आपली साथ दिली,पण तिच्या संकटात आपण काहीच करु शकत नाही,नुसतं षंडासारख बघत बसतो..खर तर आपण तेव्हा शुन्यातच जमा झालो,कारण आपल्या सखीला काही गिधाड डिवचले मारतात...आणि आपण गप्प...पण आता नाही ती वेळ आली आहे आपल्या सखीला ,मैत्रीणीला संकटातुन वाचवायची..मग आपण एक असा दगड घेतला जो सकारात्मकते उर्जेने  बनलेला तो दगड त्या गिधाडांच्या इथे भिरकावला तर बरोबर चार खांब आदळत त्या गिधाडांना जाऊन आदळला...आणि त्याक्षणी बाकी सगळं  विसरुन सखी कडे गेलो आणि तिला बोललो.." "r u ok...तुला काहीझालं  नाही ना आणि तु टेंन्शन  नको घेऊ,मी असताना तुला कोणीही काही करु शकत नाही..मी आहे ना तुझा एक मित्र...!" असं बोल्यावर तिच्या चेहऱ्यावर एक सुंदर हास्य असत,त्या हास्यच कारण एकच असत तिला एक चांगला मित्र मिळला जो तिच्या संकटात स्वाताच्या जिवाची पर्वा करत नाही... असा एक मित्र असतोच अशा प्रत्येक मैत्रीणीला,खरच प्रत्येक मुलाला अशी एक मैत्रीण पाहिजे असते ,ती त्याला समजुन घेईल,ती त्याला साथ देईल..आणि प्रत्येक मुलीला पण असा मित्र पाहिजे असतो तो तिला समजुन घेईल,तिच्या संकटात उभा राहील..तिला आधार देण्यासाठी..!
     खरच अस म्हणतात एका यशस्वी पुरूषांनमागे एक स्त्री असते..पण आजकालच्या जगात एका यशस्वी स्त्रीच्या मागे एक पुरुष असतोच असतोच......  अशावी एक creative मैत्रीण तिच्या creative कामामुळे ति खुप यशस्वी असावी...असावी एक मैत्रीण, सखी आपल्या सोबत असणारी...ती तर माझी सर्वात जवळची मैत्रीण आहे,अगदी मला क्षणात आनंद देणारी,आणि मी ही तिचा एक बेस्ट मित्र आहे, तिच्या संकटात तिला आधार देणारा एक मित्र..अशावी एक मैत्रीण, जराशी खट्याळ, तिचं आयुष्य ,तिचे निर्णय स्वतः घेऊन जगणारी असावी एक मैत्रीण... 
  
   आणि ती प्रत्येक मैत्रीण creative च असते.....

  लेखन:- अभय घाटगे..

  * सुचना:-सदर लेखाचे सगळे सुरक्षित हक्क लेखकाच्या स्वार्धीन असुन ,चित्रपट,मालिका,नाटक,अन् कोणत्याही सोशल activities वर रूपांतर करायचे असल्यास लेखकाची पुर्व परंवागी घेणे बंधनकारक आहे.. तसे केले नाही तर त्या व्यक्ती वर अथवा त्या संस्थे वर कायदेशीर कारवाई केली जाईल..

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

कस असत हे नातं

लेख:-शहरातलं सोनं.....

तिच्यासाठीच्या कविता.......