रायगडाच्या १४०० पायऱ्या चढताना...

                                                    रायगडाच्या १४०० पायऱ्या चढताना.......
                                                                                      लेखकः- अभय घाटगे
         छत्रपती शिवाजीराजे भोसले,जन्म १९ फ्रेब्रुवारी १६३० साली झाला,आणि आपल्या महाराष्ट्रात एक मर्दमराठा जन्मला....खर तर शिवाजी महाराज आणि त्यांच्या मावळ्यांन बद्दल काय सांगायचं याच मावळ्यांना घेऊन त्यांनी विजापुरचा आदिलशहा विरुद्ध,आणि मोगलांन विरुद्ध एक ऐताहासिक संघर्ष केला आणि मराठा साम्रज्य स्थापन केले.आणि रायगड ही राजधानी असलेले स्वांतत्र मराठ राज्य शिवाजी महाराज्यांनी उभे केले,.याच रायगडावर सन १६७४ मध्ये छत्रपती म्हणुन राज्याभिषेक करुन घेतला..आज त्याच रायगडाविषयी आपण जाणनार आहोत...खर तर रायरी या नावाने ओळखलेला जाणारा रायगड हा अतिभव्य गिरीदुर्ग समुद्रसपाटीपासुन १३५० मीटर उंचीवर वसलेला आहे,रायगड इ.स पुर्व १२ व्या  विजयनगर साम्राज्यात होता,व नंतर त्यानंतर तो बहामनी व इ.स १४७९ मध्ये निमाजशाही राज्यकर्त्यांच्या अधिपत्याखाली आला.निजामशाहीच्या अखेरपर्यंत ( इ.स. १६३६) रायगड त्यांच्याकडेच राहिला व पुढे सन १६४८ मध्ये तो चंद्रराव मोंरेंकडुन शिवाजी महाराजांच्या अधिपत्याखाली आला.१६६२ साली महारांजानी स्वराज्याची राजधानी व तख्ताची जागा म्हणुन रायगडाची निवड केली व १६७० साली राजधानी राजगडावरुन रायगडावर हलवण्यात आली.आणि १६८० साली मोठ्याथाटामाटात छत्रपती  शिवाजी महारांज्यांचा राज्याभिषेक पार पडला त्याच रायगडावर...आता याच रायगडाविषयी अजुन थोड जाणार आहोत,खर तर रायगड फिरताना बरीच ठिकाण पाहण्यासारखी आहे..हत्ती तलाव,गंगासागर तलाव,पालखी दरवाज्या,बाल्ले किल्ला,राण्यांचा महालांचा भाग ( अंतापुर.) धान्यांचे कोठार ,सचिवालय,महारांज्याच सिहासन,नगरखाना,कुशावर्त तलाव,वाडेश्वर मंदिर,वाघ दरवाजा,होळीचा माळ,बाजार पेठ,टक मक टोक,दारुचे कोठार,जगदिश्वर मंदिर..अशी बरीच ठिकाण आहे,म्हत्वाच तर राहिल म्हणजे रायगडाच्या १४०० पायऱ्या हे सगळ बघण्यासारख आहे,पण इंग्रजानी गड कब्जात घेतल्यानंतर या सगळ्याची नासधुस केली त्यामुळे त्याची अवस्था एखाद गुलाबच फुल कस कोमजत तशी झाली....पण १४०० पायऱ्या चढताना थोडाफार थकवा जाणवतो,मग एक विचार मनात येतो,अरे आपण येवढ्या पायऱ्या चढुन थोड थकलो,पण ते शिवरायांचे मावळे कसे चढले असतील गड...नंतर लक्षात येत कि त्यांच्यात ऐकी नावाचा बळ होत,म्हणुन तर ऐवढे हजारो मावळे १४०० पाऱ्याचढुन गेले...खर तर हेच खुप म्हत्वाचं असतं,आपण कधीपण समुहांने चालत असताना आपल्यात ऐकी पाहिजे काहीतरी मिळवण्याची तरच आपण ती गोष्ट मिळवु शकतो,आणि शिवाजी महाजांनकडुन आणि त्यांच्या मावळ्यांनकडुन हिच गोष्ट शिकायला मिळते कि आजकाल ऐकी किती म्हत्वाची आहे समुहाबरोबर चालताना......गडावर पोहचल्यावर खर तर खुप बर वाटत,पण त्याची दशा पाहुन खुपच वाईट वाटत,ज्या महारांज्यांनी रयतेच रक्षण केल,त्याच महाराज्यांच्या महालाची आज अशी अवस्था....कधी तर गडावर पिकनिक स्पॉट करतात लोक,तो इतिहास समजुन घेण्याच सोडाच पण तिथेच कचरा करुन घाण करतात हे गडाच पावित्र जपतो आपण सगळे.,१४०० पायऱ्याचढतानाची अजुन एक गम्मत सांगतो,खर तर गडाच्या भिंतीवर अनेकजणांनी कोरीवकाम करुन ठेवलेले काहीजणानी नाव लिहिलेली मग असा प्रश्न यायचा ऐवढे कोण मोठे कलाकार आहे,त्यांना चित्र काढालायला,नाव लिहियायला गडाचे दगडच भेटले....खर तर हे खुप चुकीच आहे,ज्या महारांज्यानी हा गड येवढा संघर्ष करुन मिळवला त्याच गडांच्या भिंतीवर अस कायपण लिहिताना लाज पण वाटली नाही का....?  खर तर इग्रंजानी स्वाताच्या राणीचा महाल लंडन मध्ये छान ठेवला,पण आमच्या राजाच्या महालाची अशी अवस्था का करुन गेले ते..याच प्रश्नच उत्तर कोणाकडेच नसेल....हल्ली प्रत्येकजण शिवाजी महारांज्यानच्या नावाचा वापर केवळ आपल्या फायद्यासाठी वापरु लागला,का शिवाजी महाराज बोलले का कि त्यांच नाव प्रत्येक ठिकाणी वापरा आणि स्वाताची काम करुन घ्या....खर तर आज महाराज खरोखर इथे असतील ना,तर त्यांना पहिल आपल्या रायगडाची,महालाची दशा बघुन खुपच वाईट वाटेल...आणि आपल्या महाराष्ट्रातील सगळ्याचच गडकिल्ल्याची परिस्थिती बघुन ते एक वाक्य नक्कीच बोलतील,उगाच आम्ही आमचा आटापिटा करुन स्वराज्याची स्थापना केली.,आज त्याच आमच्या स्वाराज्याची ही अशी अवस्था.....खर तर याला कोण जबाबदार आहे,आपण कि सरकार....? कारण इथे आपल्याला स्वातालापण दोष देतात येत नाही..कारण आपण थोडचं हि अवस्था केली,असा गैरसमज करुन घेतो..आणि सरकारला तरी दोष का द्यायचा,ते नुसत बोलतात पण काहीच करत नाही गडकिल्ल्यानसाठी...हा पण एक आता सरकार एक मात्र गोष्ट करत कि अरबी समुद्रात शिवाजी महारांजानचा १ कोटीचा भव्य उंच पुतळा बनवणार आहे,खर तर त्या पुतळ्याकडे मान वर करुन बघन पण कंठीण होणार प्रत्येकाच....खर एक दिवस महाराष्ट्रातले सगळे गडकिल्ले जमिनदोस्त झालेले असतील,आणि अरबी समुद्रात भव्य उंच असा पुतळा उभा असेल....पण एक विचार केला तिथपर्यंत ते बघण्यासाठी पण पैसे उकळले जाणार,महाराजानचं नाव वापरुन पैसाच पैसाच कमवणार...मग शिवाजी महारांज्यांना खरच चांगल वाटेल का..कारण त्यांच्या गडकिल्यांची अशी अवस्था झाली,आणि त्यांचा पुतळा अरबी समुद्रात उभारतात....खर तर आधी गडसंर्वधन केल पाहिजे,गडकिल्ल्याची निगा राखली पाहिजे,तरच आपली संस्कुती जपेल,आपली परंपरा टिकेल....ही प्रत्येक तरुण पिढीची जबाबदारी आहे,पण आज तरुण कोठे आहे...? आहे  पण  तो सोशल मिडियाच्या जगात हरवला आहे,त्याला फक्त भावना कळतात पण सोशल मिडियमधल्या इमोजेसच्या..... सोशल मिडिया वर  सेल्फी घेण्याच्या नादात ही पिढी आपली पंरपरा, आपली संस्कृती कुठेतरी विसरत चालेली आहे...खर तर सोशल मिडिया ला बाजुला ठेऊन,त्यांने एक  पाऊल उचल पाहिजे ते म्हणजे गडकिल्ल्याचे सर्वधनाच.....तर आपल्या  महाराष्ट्राची परंपरा टिकेल......त्या रायगडाच काय अनेक किल्ल्याच सर्वधन करताना,प्रत्येक तरुणांनच्यात एक ऐकी पाहिजे आपले गडकिल्ले वाचवण्याची..ती ऐकी असेल ना तर नक्कीच त्या १४०० पायऱ्या आपण चढु छत्रपती शिवाजी महाराज्यांच्या सैन्यामधील मावळ्यांन सारख, आणि आपले गड किल्ले  टिकु शकतात..वीरात वीर मराठी दौडले सातच,पण सातच नाही एकसात...कारण महाराज्यांच्या लाखो सैन्यामध्ये ऐकीच बळ होत..आणि तसच ऐकीच बळ हल्ली प्रत्येकात यायला पाहिजे,आपला वारसा,आपली परंपरा,आपली संस्कुती जोपण्यासण्यासाठी ते एकीच बळ आपल्याला नक्कीच हव.............
      तर आपली संस्कुती जोपासा,आपली परंपरा टिकवा आपल्या राज्याच नाव अवघ्या दहाही देशात उंच करुया....जय भवानी जय शिवाजी            
                          धन्यवाद
                                                                     

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

कस असत हे नातं

लेख:-शहरातलं सोनं.....

तिच्यासाठीच्या कविता.......