पुन्हा तेचं ऐकायला भेटलं.....

       मुक्त संवाद:- पुन्हा तेचं ऐकायला भेटलं...

          कधी तरी नायतर केव्हा तरी..पुन्हा पुन्हा तेचं ऐकायला भेटलं...आणि सुरू झाला मग तोच एक गोंधळ....

 
     नको वाटतं होतं सारखं सारखं ते ऐकु...पण त्यातले शब्द मात्र कानात जणु रेंगाळतच होते...मनातं भीतीच सावटच फुटलं जणु...पण अजून ही पुन्हा तेचं ऐकायला भेटलं म्हणून....

              घरात त्या येणाऱ्या नव्या पाहुणीचा तिरस्कार करायचे सगळेच..का तर ती बया आपल्या समाज्याची नाही खालच्या जातीची आहे...असं काहीबाही बोलायचं मग..तेव्हा मात्र मलाच भीती वाटु लागली,कि मी ही एक मुलगी आहे,उद्या जर मी प्रेमात पडले तर हा समाज काय बोलेल..? नुसती अब्रू वेशीवर टांगेल ना..कारण आज दादाने दुसऱ्या च जातीच्या मुलीबरोबर लग्न केलं,त्याला संपूर्ण समाज्याने ,घरातल्यांनी विरोध केला..मग उद्या हीच चुक मी केली तर.....

        नको नको हाच विचार करायला नको..प्रेमात पडणारचं नाही मी,मरुदे त्या सगळ्या भावना...या समाज्यापुढे काय करु मग मी  एकटी मुलगी...? आईबापाला पण पोट्याच्या पोरीच्या भावना दिसणार नाही, त्यांना फक्त त्या  समाजचं बरोबर वाटणार...म्हणून पुन्हा एकदा तेचं ऐकायचं नाही मला,कि प्रेमामुळे आपली सख्खी नाती आपला तिरस्कार करता ते......

कधी तरी वाटतं मग...या जगाच्या प्रेमातच पडु नये..कारण जगच खुप स्वार्थी आहे...पण  या जगात मात्र पुन्हा पुन्हा तेचं ऐकायला भेटतं..कि "आपल्याचं जातीच्या,पंताच्या व्यक्ती बरोबर लग्न कर हां..........!"

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

कस असत हे नातं

लेख:-शहरातलं सोनं.....

तिच्यासाठीच्या कविता.......