प्रिय गर्लफ्रेंड
पत्र:- प्रिय गर्लफ्रेंड....
जानु,बच्चा,डार्लिंग कळतं नाही यापैकी कोणाला लिहु पत्र...कारण यांच्यामध्ये माझी हक्काची मैत्रीण कुठे आहे तेच कळतं नाही.... तरीपण या सगळ्यांना लिहितो मी हे पत्र...तर पत्र लिहिण्यास कारण कि,खर कुठुन सुरुवात करु तेच काही केल्या उमजत नाही...कारण तुझ असं माझ्या आयुष्यातुन अचानक जाणं मला पटलं नाही... प्रपोज करताना आपण किती विश्वासाने बोलतो,आयुष्यभर आपण साथ निभवुया...मग का नाही निभवत आपण साथ...सतत गोंधळ करायचा या सगळ्याच्यात अगदी तसचं झालं आपल्या आयुष्यतही....कारण आपण प्रेमाची सुरुवात करताना प्रेमाच्या किती आनाबाका करतो,त्याच प्रेमावर विश्वास ठेवतो...पण नंतर का अस अर्धवट ते नातं सोडुन जायच्या गोष्टी करतो,ही गोष्ट पटत नाही मला ग...तु किती सुरूवातीला छान बोलत होती,अगदी समजून उमजुन पण नंतरच मी जास्त तुला वेळ देत नाही म्हणून तु तिरसट बोलायला लागली......आणि कदाचित हेच कारण आहे आपलं नातं तुटण्याचं,तुला फक्त वाटतं मी दररोज तुझ्या बरोबर असावं,दररोज तुला वेळ द्यावा अगदी प्रत्येकक्षणी आपलाच जास्त सहवास असावा असं तुला मनोमनी वाटतं....पण यार तु तरी समजून घेशील अशी खात्री होती मला....सध्या खुपचं problem चालु आहे माझ्या घरी...शिवाय माझ्या स्वतः च्या करिअरच टेंन्शन,या सगळ्या गोष्ट मध्ये मी बुडुन गेलो ग...घरच्यांची इच्छा आहे,कि जॉब करावा मी आणि डाटा इंनटरी मध्ये घरच्यान च्या इच्छेखातर job मिळाला मला...पण दररोज एकच भीती वाटते ग,आपलं करिअर वेगळ,आणि job वेगळा यामध्ये मला मानसिक समाधान काय असतं तेचं मिळतं नाही ग,त्यामुळे तुला वेळ देण,तुझ्याबरोबर तासनतास बोलन या सगळ्या गोष्टी राहतात...आणि तु असं साध्या कारणावरून लगेच सोडुन जायला नाही पाहिजे होतं,तुच म्हणायची ना,प्रेमात विश्वास म्हत्वाचा असतो, understanding म्हत्वाचं असतं,म्हणजे दोन जिवांनी समजून उमजुन राहणं...तरीपण तु अशी तुझ्या या बबला ला,जानुला, आणि म्हत्वाचं म्हणजे तुझ्या मोबाईल मध्ये माझा नंबर गप्पू..असा seve करुन ठेवलेला त्याच्यावर तु इतक्या अविश्वास का दाखवला.....? का अशी वागली,आपलं प्रेम, आपल्या भावना,आणि म्हत्वाचं म्हणजे आपल्या मैत्रीमधला विश्वास..कारण आपलं प्रेम होण्याच्या अगोदर एक चांगली मैत्री झाली....तिचं खुप म्हत्वाची आहे आपल्या नात्यात असं मला वाटत...पण तु त्या मैत्रीवर पण विश्वास ठेवला नाही लगेच ब्रेकप च्या गोष्टी केल्या तु अगदी साध्या कारणावरून....अग तुला एक सांगू का..? कोणत्याही नात्यामध्ये साध्या कारणांमुळे भांडण होतात म्हणून काय त्या नात्यामध्ये लगेच ब्रेकपच्या गोष्टी करायच्या नसतात.....उलट त्याच भांडणाकडे एक गम्मत म्हणून पाहयचं तरचं प्रेम या नात्याची खरी गम्मत कळते आपल्याला.....फक्त तुला ऐवढचं सांगायचं कि,माणुसं प्रेमात पडतो,पण नंतर जेव्हा आपलं प्रेम सोडुन गेल्यावर आपण एकटे पडतो तेव्हा त्या सगळ्या गोष्टी नाही विसरता येतं...म्हणजे प्रेमात असल्यावर आपण छान गप्पा गोष्टी करायचो,एकत्र हातात हात घेऊन फिरायचो....ते CCD मध्ये कोल्ड कॉफी विथ आईसक्रीम आणि वेझ बरगर...आपण दोघेही खायचो....पण तु त्या हॉट कॉफीसारखी का वागली,क्षणार्धात त्या आईसक्रीमला ही विरघळवलं तु...खर तर तुझ इथेच चुकलं.... आपलं नातं हे कोल्डकॉफी विथ आईसक्रीमचं सारख असतं..त्यात एकजण कोल्डकॉफी असतो,तर दुसरा आईसक्रीम...दोघांनमध्ये खुप understanding असावं लागतं..म्हणजे समजून उमजुन घेण्याची तयारी..... तरच त्या नात्याला बहर येतो......
मला कळतं नाही पण का कुणास ठाऊक,पण पत्र लिहियला शब्दचं अपुरे पडतात,जशी तु माझ्या आयुष्यातुन गेली ना अगदी तसेच ते शब्दही गेले माझ्या आयुष्यातुन...का असं आपण आपल्याचं आयुष्याशी खेळ खेळत असतो असा जगावेगळा तेच कळतं नाही...आणि आपण दोघांनीही खेळचं केला आपल्या प्रेमाचा,त्या प्रेमातल्या शब्दांचा..तर कधी त्या प्रेमाच्या कवितांचा....तर कधी CCD मध्ये कोल्डकॉफी विथ आईसक्रीम सोबत प्रेमाच्या गप्पा मारण्याचा...या सगळ्यांच एकंदरीत खेळ झाला आहे...आणि तु तो खेळ सुरु करण्यात आंनदी होती,पण नंतर खेळता आला नाही म्हणून तिथेच तो खेळ संपवून गेली...हेच तु दाखवलं प्रेम म्हणजे काय असतं...? तुम्ही मुली एकवेळ रडुन आपल्या भावना व्यक्त करू शकतात ग,पण आम्ही मुलांनी काय करायचं आमची हक्काची व्यक्ती सोडुन गेल्यावर.... ?सांग ना......आपल्या मैत्रीची पण पर्वा केली नाही तु,आज मला एकच खंत वाटते माझी बेस्ट मैत्रिणी कुठे गेली.? जी वेळ प्रसंगी मला समजून घेणारी,माझ्या चुका दाखवून मला suggestions देणारी, तर कधी माझ्या दुःखात मला आधार देणारी माझी सखी,सोबती कुठे गेली.....आता पत्र इथेच थांबतो लिहियचं,पण या दुःखातुन माझी मैत्रिणी कधी मला सावरायला येईल,आणि कधी पुन्हा आयुष्याची साथ द्यायला येईल याचीचं वाट बघतो..कारण खरच माणुसं चुकतो प्रत्येक गोष्टीमध्ये पण आपण ज्याच्यावर प्रेम करतो ना,त्याच्या चुकाना आपलं करून घेणं पण आपलंच कर्तव्य असतं..तरच ते प्रेम टिकतं....तु नक्की माफ करशील तुझ्या या गप्पूला..मला प्रत्येक माणसांन बरोबर गप्पा मारायला खुपआवडतं म्हणून तु या नावाने नंबर seve केला गप्पू....म्हणून तर माणसं कळतात गप्पा मारल्यावर,आणि माणसं कळली कि मग प्रेम कळतं अगदी आपलं आहे तसं जरा हटके प्रेम...........!
तुझाच लाडका,मनापासून प्रेम करणारा आणि तुला दरवेळी प्रेमाने मनापासून हसवणारा......
गप्पू....
लेखन:- अभय घाटगे.©
टिप्पण्या