आणि शेवटचा प्रयोग....

                 लेख:- आणि शेवटचा प्रयोग...

       

    तिसरी घंटा होते,नाट्यगृहात सगळीकडे अंधार,पण फार कमी प्रेक्षक असतात म्हणजे असंं म्हणायचं झालं तर त्यातले अर्धे प्रेक्षक  हे पास घेऊन बसलेलं...दोन तिन असतील त्यांनी  तिकीट काढलेले..काय करणार प्रायोगिक नाटकानचा  show होता ना ,मग गर्दी कशी...? आणि तोवर रंगमंच प्रकाशमान होतो,रंगमच्यावर साजसं एका बंगल्याचं नेपथ्य उभ केलं असतं...आणि एक  70 वर्षाचे   आजोबा येतात..ते सैन्यात होते असा त्यांचा रूबाब, पिळदार मिशा..त्यांच्या आवाजा  थोडसा उच्च स्वर होता,आणि खणखणीत.. कोणाला ते वयस्कर आहे असं वाटतं पण नव्हतं....खर असं सगळ त्या नाटकात होतं,आणि म्हत्वाचं म्हणजे त्या नाटकाचा शेवटचा प्रयोग होता..अवघे  25 प्रयोग करून ते नाटक बंद होणार होतं..याची आम्हा सगळ्या कलाकारांना एक खंत वाटायची सारखी..आता इथुन पुढे कधीच या नाटकात आपल्यावर लाईटस पडणार नाही, या नाटकातली भुमिका मनापासून जगणार नाही, सगळ कसं भकास होईल आयुष्यात आपलं हे खुप म्हत्वाचं नाटक बंद झालं तर...पण का निर्मित्यांने ऐवढ्या लवकर हा निर्णय घेतला...तेच कळतं नाही, कधी वाटतं,कदाचित प्रायोगिक नाटक आहे म्हणून त्यांनी हा निर्णय घेतला,कारण हल्ली प्रायोगिक नाटक बघायला जास्त प्रेक्षक कुठे येतात,त्या सगळ्या प्रेक्षकांना मोठे सेलिब्रिटी ची नाटक बघायला आवडतात....प्रायोगिक नाटकातल्या कलाकारांना कोण बघायला येईल..थोडीच ही लोक फेमस झाली.....पण आम्ही आमचा तो शेवटचा प्रयोग मनापासून जगलो,खर तर मला एक चिंता लागुन राहिली सारखी,आजच्या प्रायोगिक नाटकांना प्रेक्षकच पाहिजे तसा मिळतंच नाही... कितीतरी प्रायोगिक नाटक रंगमच्यावर येतात,नवीन लेखकांनची,नवीन दिग्दर्शकानंची,नवीन कलाकारांची....प्रत्येक प्रायोगिक नाटकाचा विषय हा वगेळा असतो,खर अशी पण नाटक प्रेक्षकांनी बघावी,तर त्यांना एक वेगळाच अनुभव घेता येईल.....शेवटचा प्रयोग आमच्या नाटकांचा इथुन पुढे या नाटकातलं गण्या हे पात्र कधीच साकारता येणार नाही, जेवढी त्या पात्रावर मेहनत घेतलेली,परिश्रम केलेलं,तनमनश्वास सगळा पणाला लावलेला,आता तेच पात्र उद्यापासून नाहीस होणारं,मग पुन्हा नवीन नाटक,पुन्हा नवीन पात्र,त्या पात्राला जगवण्यासाठी कलेली मेहनत या सगळ्या गोष्टी जुळून येतील,पण ते नाटक सांगता येत नाही किती प्रयोगांच असेलं....कारण एखाद्या नाटकाराने,किती सुंदर नाटक असेल,पण त्याला एखादा चांगला निर्माता भेटनचं कठीण, म्हणुन आजकालची प्रायोगिक नाटक ओसाड पडतातं....मला फक्त मायबाप रसिक प्रेक्षकांनाचा ऐवढच सांगायचं, तुम्ही सेलिब्रिटी ची नाटक बघायला पटकन जातात,पण एका नवीन कलाकाराचं नाटक बघायलाच आवडतं नाही...नका रे असं करू,रंगभुमीसाठी कोण वेगळ नसतं,तिच्यासाठी तो कलाकार सारखाचं असतो.....एक कलाकार म्हणून ऐवढच सांगण आहे  माझ या मायबाप प्रेक्षकांना कि नवीन कलांवत आणि सेलिब्रिटी कलांवत यांच्यामध्ये कधीही दुजोभाव करू नका,दोघांचीही नाटक बघायला जावा,कदाचित नवीन कलावंत कडुन नवीन गोष्टी शिकायला भेटतील..जिवन जगण्याच्या..त्यांमुळे आजची प्रायोगिक नाटक बघा,त्यातपण एक वेगळी संहिता असते,बस्स ऐवढच सांगण आहे एखाद्या नवीन कलाकार चं प्रायोगिक नाटक हाऊसफुल्ल करा.....आणि  आमचं नाटक संपल,आता जणु  कधीच त्यातली प्रत्येक पात्र जिंवत होणार नाही...आता नव पर्व,नवी भुमिका,नवी जबाबदारी घेण्यासाठी रंगभुमीवर पुन्हा  एकदा हा नवा कलाकार साक्षिदार होणार......!

लेखन:- अभय घाटगे..

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

कस असत हे नातं

लेख:-शहरातलं सोनं.....

तिच्यासाठीच्या कविता.......