लेख-मी ,दिवाळी आणि वरळी....





    
                                                                              लेखः- मी,दिवाळी आणि वरळी.......
                                                                                                                               लेखकः- अभय घाटगे.

       माणसानचं तसं प्रत्येक गोष्टीमध्ये नातं निर्माण होतं,मग ति गोष्ट एखादी वस्तु,एखाद घर,पुस्तक,आणि आपण जिथे लहानाचं मोठा झालो तो एरिया....या गोष्टींनबद्दल एक वेगळीच नाळ तशी प्रत्येकाच्या मनात जुळली असते,अगदी मनापासुन...खरतर तसं माझही असचं नातं जुळालेलं आहे,त्या गोष्टीची नाळ तशीच माझ्या मनात अजुनही आहे,ति गोष्ट म्हणजे मी जिथे लहानाचा मोठा झालो ते मुंबईमधल छोटसं गिरणगाव वरळी.......तर वरळी बद्दल काय सांगताना,काय सांगु नी किती सांगु असं झालं नुसतं,कारण वरळीमध्ये आपले प्रत्येक सण,उत्सव,पंरपरा आपली संस्कृती जोपासली जाते,अगदी दहिकाल्यापासुन ते गणपती,नवरात्री पर्यंत सगळे उत्सव कसे आपल्या मराठी संस्कृतीप्रमाणे साजारे होतात...अगदी वरळी पोलिस कॅम्प पासुन ,वरळी बिडिडि चाळ,वरळी नाका,जिजामाता नगर,वरळी कोळीवाडा,सेंन्चुरी भवन.....प्रत्येक सण,उत्सव साजरे होतात इथे ति एक वेगळीच मज्जा असते,आपल्या माणसांन बरोबर करण्याची,आपण कितीही प्लॅट मध्ये रहायला गेलो असलो तरी,वरळीमधल्या चाळीची,मज्ज्या काही येणार नाही,कारण इथे आपल्याला विचारायला हक्काची आपली माणसं असतात ना,आपली काळजी घेणारी,आपल्या मदतीला लगेच धावुन येणारी अशी माणसांन असतात ना......म्हणुन वरळी सोडणाऱ्याला राहुन राहुन सारखीच वरळीची आठवण येतचं असते,कारण मुलगा जरी आईपासुन लांब गेला ना,तरी त्याला आपल्या आईची आठवण कशी लगेच येत,अगदी तसं वरळीपासुन लांब गेलेल्या प्रत्येक माणसांच होत...तसा मी वरळी पोलिस कॅम्प मध्ये राहिचो,पोलिस कॉलनीतले सण पण मस्त होते,दहिहंडी,गणपती,नवरात्री,कोजागिरी ,दिवाळी हे सगळे सण आम्ही एकत्र येऊन साजारे करायचो,खुप गम्मत यायची या सगळ्याची...म्हत्वाचं सांगायचं झालं तर,दिवाळीची खुपचं मज्जा यायची  आम्हाला,कारण दिवाळीला मोठा कंदील बनवायचा असतो बिल्डिंगसाठी त्यासाठी रात्र रात्रभर जागणं,मग दिवाळीच्या पहिल्या दिवशी सकाळी लवकर उठुन मित्रांनसोबत फटाके उडवणे,नंतर घरी येऊन आईने केलेला फराळावर ताव मारणे,पण दिवाळीच्या दिवसात आमच्या पोलिस कॅम्प मध्ये दररोज दत्त मंदिरामध्ये भंजन,किर्तन असायचं..मग कधी कधी लहान असताना जायचो आजी बरोबर भंजनाला....तेव्हा खुप प्रसन्न वाटायचं...आता पण या सगळ्या गोष्टी होतात,पण आपणचं नाही तिथे यागोष्टी अनुभवायला.....परतं संध्याकाळी पुन्हा फटाके उडवायचो,बाजुलाच वरळीसिफेस असल्यामुळे कधीकधी तिथेपण फटाके वाजवायला जायचो,मस्तपैकी गा हवा,सोबतीला समुंद्र आणि त्यातचं फटाके उडवायचो आम्ही हे सगळ जुळुन यायचं एकदम मस्तपैकी....परत दिवाळी वरळी मध्ये बऱ्याचं स्पर्धा,खेळ,मनोरंजनाचे कार्यक्रम व्हायचे,त्यामध्ये पण सहभागी व्हायचो,अजुन चांगला आठवतयं पोलिसांच्या कुटुंबासाठी आमच्या इथे नाटक ठेवलली,कधी ते नाटक बघायला पण जायचो.....खुप धमाल मस्ती करायचो आमच्या वरळीमध्ये....पण कधी कधी  एका गोष्टीची सारखी खंत वाटायची कि,आपला बाबा आपल्या सोबत नाही दिवाळी साजरी करायला,सकाळी जायचा ते रात्री उशीरा याचा.....कधी कधी तर यायचां नाही.....कारण पोलिसांच्या आयुष्यात कुठे दिवाळी ,दसरा त्याच्या आयुष्यात हे सणच नाही आपल्या माणसांन बरोबर साजरे करण्याचे,त्यांच्या आयुष्यात एकच फक्त बंदोबस्तला उभे रहा,काय साला आयुष्य असतं ना पोलिसांनच त्यांना दिवाळीला बोनस सोडा,पण घरच्यांन बरोबर दिवाळी साजरी पण करायला देत नाही,हीच खरी पोलिसांनच्या आयुष्याची शोंकातिका आहे असं म्हणायला काही हरकत नाही....वर्षातले प्रत्येक सण आम्ही आमच्या बाबांनाविना घालवतो,कारण तो पोलिस आहे ना,पोलिसांना जनतेच्या रक्षणासाठी सदैव तत्पर राहियालाच पाहिजे,शेवटी तेच ब्रीद वाक्य आहे ना पोलिसांच....सोड मी ही गोष्ट काढुन कुठे इमोशन करतो,खरतर मी वरळी बद्दल,वरळीच्या माणसांन बद्दल,त्यांच्या प्रेमाबद्दल सांगायचं ना.....खरतर दिवाळी सगळा शेजार पाजार फराळला बोलवतो,भाऊबीजेचा एक किस्सा सांगावा वाटतो,त्यादिवशी तर संपुर्ण बिल्डिंग मधल्या ताई लोक ओवाळण्यासाठी येतात......मग ते झालं कि आई सगळ्यांना फराळ देते..खुप मस्त वाटायचं..नवी नाती नवे बंध तेव्हा जुळायचे.......या सगळ्या गोष्टी आठवल्या ना कधी तर सारखी वरळीतल्या दिवाळीची आठवण येते.....तिकडच्या मातीची,तिकडच्या समुद्राची,जांबोरी मैदान मधल्या अंबा बाईच्या देऊळाची,त्या वरळी मधल्या सगळ्यांच गल्ल्यांची राहुन राहुन सारखी आठवण येते,,प्रत्येक वर्षी दिवाळी आली कि असं वाटतं,साला यार आपण काहीतरी गमवतं....मग तेव्हा कळतं वरळीतली दिवाळी मधली मज्जा मस्ती,मित्रांन सोबत रात्र रात्र भर बिंल्डिंगचा कंदिल बनवण्यासाठी जागणं,नंतर एकत्र दिवाळीच्या पहिल्या दिवशी पहाटे लवकर उठुन फटाके वाजवणं...या गोष्टी कुठेतरी हल्ली गमवल्या आपण वरळीपासुन खुपच लांब गेल्यावर..खुपदा असं वाटतं पुन्हा जावं  वरळीत,वरळीत घर घ्यावं स्वःताचं,पण तिथे घर घ्यायला सामान्य माणसांना परवडलं पाहिजे ना....कारण जागेचा भावा खुपचं दुप्पटीने चालेला आहे,चांगल्या एरियात रुम घ्यायची म्हणजे प्रत्येक सामान्य माणसांला दहा दाहा वेळा विचार करावा लागतो,मग तो रुम घेतो पण बदलापुर,पनवेल,वाशी,ठाणे इथे....पण वरळीतल्या प्रत्येक सणाची आठवण काय त्याच्या मनातुन जातं नाही,जसं दुर असलेल्या माणसांनशी कशी आठवण दररोज येते,तशी प्रत्येक सणाला वरळीमध्ये राहुन गेलेल्या प्रत्येकालाच त्या वरळीची सारखी आठवण येतचं असते......त्या वरळीची सिफेसची,वरळी नाक्याची,जांबोरी मैदानाची,त्या वरळीबिडिडि चाळ ची,वरळीमधल्या त्या प्रत्येक गल्लीची,आणि म्हत्तवाचं म्हणजे वरळी पोलिस कॅम्पची,या गोष्टीत नुसता रमून गेलो नसतो,तिथेल्या प्रत्येक सणाशी माझी नाळ जोडली जणु...तिथल्या आपल्या माणसांनशी,तिथल्या मातीसी एक वेगळचं नातं जोडलं गेलं आहे नकळतं पणे एवढ मात्र नक्की......म्हणुन तर वरळी मधले सण उत्सव,याची परंपरा असतेच भारी..........!

                                                                आणि असं माझं वरळी...........
                  

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

कस असत हे नातं

लेख:-शहरातलं सोनं.....

तिच्यासाठीच्या कविता.......