लेख:- नाटक आणि मी..

                   लेख:-नाटक आणि मी....!

      आणि तिसरी घंटा होते,नाट्यगृहातले सगळे लाईट बंद होतात,अनाऊसमेंट होते,"रंगदेवता आणि नाट्यरसिकांना विन्रम अभिवादन करून सहर्ष आणि सविनय सादर करीत आहोत.." "नाटक आणि मी......" मग रंगमच्याचा पडदा उघडतो....!
    तसं बघायला गेलं तर नाटक ही गोष्ट जन्माला आल्यापासूनच करतो,अगदी तान्ह कुकुल बाळ असताना रडण्याचं नाटक करायचं,तर उगाच हट्टीपणा करायचं नाटक करायचं...खर तर माझा जन्मच नाटक करण्यासाठी झाला आहे असं वाटतं, जसं जसा मोठा झाल्यावर शाळेत न जाण्यासाठी आईजवळ आजारपणाचं नाटक करायचो...याचा संबंध जणु संपूर्ण आयुष्याशी जोडला...नंतर रंगभुमीवर नाटक करण्यासाठी सज्ज झालो,सुरूवातीला  पडद्याआड राहुन नाटक केलं,नंतर हळुहळु नाटकात वेगवेगळ्या   भुमिका करून,त्यातल्या भुमिकेने मला आयुष्य जगण्याची एक वेगळीच उम्मीद दिली,तशी ति अजुन आहे...कोणी विचारना मला सध्या काय करतो, तेव्हा नाटक करतो असं सांगितल्याबरोबर सगळेच आश्चर्यचकीत होतात,नाटक करायचं म्हणटलं कि खुप शिव्या शाप ऐकाव्या लागतात घरच्यांनच्या कारण फार तर नाटकात काम करायला कोणाच्याचं घरचे परवानगी देत नाही,त्यांना वाटतं नाटकात काम करणे म्हणजे भिकेला लागणं,पण तसं नाही जर तुम्ही असे म्हणायला लागला तर आजची नाटक खरच जास्तीत जास्तीत लोकांनपर्यंत पोहचतील  का...? नाहीच पोहचणार कारण असं बोलल्यावर त्या नटाच्या घरच्यांनी त्यांच नाटकात काम करणंच बंद केलं तर,कशी होणार नाटकांनची प्रगती,पण माझ्याबाबतीत खुपचं वेगळ आहे..देवाच्या आर्शिवादाने,असे आईवडील लाभले मला जे माझ्या नाटकाला पुर्णपणे सपोट करतात,ते नेहमी बोलतात,तु कर नाटक.....बस्स त्याच्या या बोलण्यांने माझ्या मध्ये एक वेगळाचा आत्मविश्वास येतो....म्हणून आता काहीही झालं तरी नाटक करायचं,ते जगवायचं आणि रंगभुमीवरचा नटसम्राट होण्याचा मान मिळवायचा...तरच आपण केलेल्या भुमिकांनच या जगात सार्थक होतं,बरच्यादा याच  नाटकांने मला खुपकाही गोष्टीं शिकवलेल्या वेगवेगळ्या ,चांगले वाईट अनुभव मिळाले रंगभुमीवर काम करताना,खरतर आजची तरुणपिढी नाटक या गोष्टीकडे हक्काने वळते,त्यांना नाटक बघायला आवडतात,हेच खुप मोठ भाग्य आहे रंगभुमीचं असं मला वाटतं...पण आता वेळ आली ति आपणं स्व:ता नाटक करावं,ते नाटक जगावं,आणि रंगभुमीवर  काहीतरी नवीन  सर्जनशीलता आणावी नाटकामध्ये,वेगळा विषय,त्याला साजसं असं नेपथ्य,प्रकाशयोजना असावी असं एखादं तरी नाटक रंगभुमीवर आणावं,कारण हल्ली विविध प्रयोग असलेली नाटक रंगमंचावर येतात,काहीतरी आधुनिक तंत्रज्ञान  वापरून लेखक दिग्दर्शक नाटक तयार करतात हि खुप मोठी गोष्ट आहे, तसं माझं स्वप्नं आहे असेच काहीतरी आधुनिक तंत्रज्ञान वापरून नवीन प्रयोग करावेत रंगभुमीवर,ज्या गोष्टी अशक्य वाटतात,त्याच गोष्टीतुनच कधीपण सुरुवात करायची असते,तरच यश मिळतं,आणि जगात अशक्य हि गोष्ट नाही आहे मुळीचं.....तो फक्त माणसांनच्या मनातला एक विचार आहे, अमुक अमुक गोष्ट  ही अवघड असते,पण तसं नाही, त्या गोष्टीकडे निट पाहिलं ना तर ति अवघड गोष्ट कधी सोप्पी होऊन जाते ते कळणार पण नाही..ही गोष्ट पण नाटकामधुनच शिकायला मिळाली,म्हणजे अवघड गोष्टी कितीही येऊ दे आयुष्यात पण आपण हार कधीच मानायची नाही, उलट त्या अवघड गोष्टींना सतत प्रश्न विचायचा अगदी गोंधळुन ठेवायचं त्या अवघड गोष्टींना,मग आपल्या प्रश्नांचं पाहिजे तसं आणि योग्य उत्तर कळतं नकळतं पणे आपल्याला सापडतं ते साध कळणार पण नाही.....हे नाटक करताना जाणवत,अगदी मला अजुन एक आठवतयं,जेव्हा कॉलेज मध्ये असताना एकांकिकेच्या वेळी केलेल्या तालमी, नंतर प्रयोगाच्या वेळी तो वेगळाच उत्साह, कधी कधी दिग्दर्शक दादाच आमच्या मध्ये तेव्हा एक वेगळीच सकारात्मक उर्जा देत होता,हे सगळचं खुपच मस्त होतं,तेव्हा कुठेतरी वाटायचं साला आता काही झालं तरी चालेलं पण नाटक ही गोष्ट सोडायची नाही, नाटकात काम केल्यामुळे निदान माणसासारखं तरी जगता येतं...कारण हल्लीच्या काळात सगळे गोंधळलेल्या  गर्दीत लोकांना माणुसं म्हणुन कसं जगायचं तेच काही केल्या कळतं नाही.... पण नाटकाने मला हेच शिकवलं माणुसं कसा असतो ते,विविध विचारांचे पात्र साकारून........अगदी नाटकाच्या पहिल्या प्रयोगाच्या वेळी पोटात एक वेगळाच गोळा येतो,पण जसं रंगमंच्यावर गेल्यावर तो गोळा अचानक निघुन जातो,हे साध कळतं काय वळतं पण नाही,खरचं नाटक  करण्याची,जगण्याची,अनुभवण्याची एक वेगळीचं मज्जा असते,कारण तेव्हा हजारो प्रेक्षकांनच्या टाळ्या ,शिट्या वाजतात ना....तेव्हा कुठेतरी आपण साकारलेल्या भुमिकेच सार्थक होत असतं मात्र...कधी कधी याच  रंगभुमीने  मला शिस्त लावली,तर याच रंगभुमीने मला वेळेचं म्हत्वं शिकवलं...जणु आई आपल्या मुलावर कसे संस्कार करते,तसचं रंगभुमी साऱ्या कलाकारांनवर संस्कार करतं असते....हे कोणतही नाटक साकारताना याचा प्रत्यय येतो, खरतर नाटक हे माध्यम च खुप वेगळ आहे, आणि थेट मायबाप रसिकप्रेक्षकांनशी संवाद साधता येतो..मग विचार येतो अजुनही पुन्हा नाटक करावं,नाटक जगावं.....कारण हेच माध्यम आपल्याला आयुष्यात खुप सुख देऊन जातं,म्हणुनच,असं म्हणतात कि जगाच्या रंगमंच्यावर असे वावरला कि तुमची भुमिका संमपल्यावर ही टाळ्या वाजत राहिल्या पाहिजे.....कारण एका नटाचा प्राण रंगभुमी असतो...आणि रंगभुमी मात्र माझा प्राण आहे,आयुष्यभर तिची सेवा करायची,वेग वेगळे नवीन दर्जेदार प्रयोग करायचे मराठी रंगभूमीवर...... हेच एका नटाचं वैशिष्ट्य असतं ना....!

   आणि येथे पडदा पडतो,नाटक आणि माझा संवाद इथेच समतो कारण नाटकाला जशी सुरुवात होते तसा शेवट असतो ना,माझ्या नाटकाचा शेवट एकच आपलं नाटक शेवटपर्यंत रंगभुमीवर जगावायचं......!

लेखन:- अभय घाटगे

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

कस असत हे नातं

लेख:-शहरातलं सोनं.....

तिच्यासाठीच्या कविता.......