पत्र:- प्रिय स्त्री..

                       पत्र:- प्रिय स्त्री....
                                                                                        
                             
       खरतर नेमक कुठुन सुरूवात करू पत्र लिहियाला तेच कळतं काय साध वळतं पण नाही, कारण आयुष्याच्या अनेक वळणावर स्त्री भेटत गेली,आज त्याच स्त्रीला हे पत्र लिहिताना शब्दचं हवे तसे आणि पाहिजे तसे वळतं नाही आहे, पण लिहितो मी पत्र त्या प्रत्येक स्त्रीला जी एका पुरुषांच्या बरोबरीने हल्ली काम करताना दिसते,पुरुषांनसारखीच प्रत्येक गोष्टीमध्ये खुपचं सक्रिय होताना दिसते,म्हणून तुरतास लिहितो मी हे पत्र त्या स्त्रीला...तर पत्र लिहिण्यास कारण कि,तुझी ही आजच्या धकाधकीच्या जिवनात स्व:ताला सिद्ध करण्यासाठीची जिद्द पाहुन खरच हेवा वाटतो तुझा,म्हणजे आजची स्त्री पुर्णपणे बदलली,त्याच जुनाट संस्कृती, चालीरीतींन मध्ये तु अजुन नाही अडकली,तु तुझं स्वप्नं, तुझी इच्छा साकार करण्यासाठी झगडु लागली..परत दहावी बारावी सारख्या परिक्षेत तुझं यश पाहुन खुप अभिमान वाटतं बघ ,हीच उर्जा एक बघुन नवीन सकारात्मकता येते....कारण पुर्वी  स्त्री म्हणजे "राधां वाडा उष्टी काढा..." हे समीकरण असायचं पण आता दिसतं नाही कारण आता तु स्व:ताच्या घरचं करून 12-12 तासं बाहेर काम करते ना,ते पण तुझ्याच आवडीच्या क्षेत्रात....पण खरच उत्तम आहे.. बदलत्या काळाबरोबर तु स्व:ताला बदलण्याचा जणु विडाचं उचलला..पण मनात एक शंका येते ,भीती वाटते..जग कितीही चांगलं असलं ना,तसं वाईटही आहे ग हे संपूर्ण जग...या जगात अर्ध्याच्या वरचे सगळीचं माणसं हैवाण आहे,त्या माणसांना ऐवढीस चिमुकली पोर,तरुणी,नायतर म्हातारी स्त्री पण दिसत नाही सतत एखाद्या गिधाडासारखी झडप नुसती घालतात ति सर्वजण...या गोष्टीची खुप भिती वाटते,कारण तु एकटी कुठपर्यंत लढाई करशील, पण तु काहीच काळजी करू नको,मी असेल तुझ्याबरोबर ही लढाई करायला,आई जिजाऊंन बरोबर शहाजी राजे होतेच कि,तसा मी तुझ्या पाठीशी खंबीरपणे राहिली,त्या अनेक श्वापदांना मारायला....मी आहे तुझ्या आयुष्यातला एक कुष्ण,तर एक शिवाजी ,आणि संभाजी परत गोपाळराव,बाबासाहेब आणि तुझ्या पाठिशी कायम राहणार एक देवदुतच आहे मी.....फक्त तु विश्वासाने आणि सकारात्मक गोष्टी ने अनेक वळणाच्या वाटेवरून सरळ जात रहा,हा त्या वाटतेत खडतर रस्ते आले तर अजिबात घाबरून जाऊ नको,त्या वाटेत नक्की मी तुला सावरण्यासाठी येईल तुझा एक देवदुत बनुनं ऐवढ मात्र नक्की....तुझी एके ठिकाणी प्रगती होत असताना,दुसरीकडेच तुझीच लग्नानंतर क्रोमार्यचांचणी घेतली जाते कंजारभट या समाज्यात,खरच तेव्हा खुपचं मनाला लागत ना काय सांगु  तुला,कि आजची स्त्री ऐवढी शिकली,स्व:ताच्या दुष्टीकोनातुन प्रबळ झाली तर हा समाज एखाद्या स्त्रिच्या  व्हर्जिनिटी वरून ऐवढी शंका का घेतो तेच कळतं नाही बघ...म्हणजे एकंदरीत काय झालं  जग बदलतय ,जगातल्या स्त्रिया पण आता बदलु लागल्या पण समाज अजुनही त्याच जुनाट चालीरीती, रिवाजमध्ये अडकला त्यातुन तो काही केल्या बाहेरच पडत नाही,फक्त आपल्या विचारांने त्या प्रत्येक स्त्री च्या वाटेवर नुसतं बंधन आणतो...सांग आता तु हा समाज का नाही बदलतं...? का आहे तिथेच आहे नियम मोडलेल्या गर्दीसारखा,कसं आपलं चालु आहे म्हणून चालुन घ्यायचं म्हणून तर भारत अजुनही हरलेला देश आहे,कारण इथे काळाप्रमाणे स्त्री सार्मथ्यहीन होते,तिच्या स्व:ताच्या बळावर या जगात ताठमाने जगते तर एकीकडे हा पाश्चिमात्य समाज स्त्रीचं जगणं हिरावून घेतो,हेअसं सगळं करून..हीच गोष्ट चुकीची आहे बघ,पण आता ही प्रथा बंद होयाला पाहिजे,तरच आपल्या देशाची प्रगती खऱ्याअर्थाने होईल,कारण प्रत्येक स्त्री ही देशाची ओळखं आहे आणि ती ओळख आपण टिकवून ठेवण ही काळाची गरज आहे...बर मग तुझ्या प्रत्येक गोष्टीमधली एक तारा बनं,असा तारा आयुष्यभर कायमचा चमकतचं राहिला पाहिजे,तरच तुझ्या सारख्या नव्याने जन्मलेल्या स्त्रिया अशाच त्यांच्या पुढच्या आयुष्यात त्यांच्या प्रत्येक गोष्टीमध्ये अशाच तारा बनुनं चमकायला पाहिजे, स्व:तामधला एक अनोळखा तारा होऊन...चल ऐवढ बोलुन मी हे पत्र इथेच थांबतो,पण तु मात्र तुझी कोणतही गोष्ट थांबवू नको,त्या गोष्टी मध्ये सक्रिय रहा फक्त...कारण तु उद्याच्या भारत देशाच भविष्य आहेस,तर भारताचा अभिमान तु आहेस....आणि फक्त तुझ्या गोष्टी मध्ये सकारात्मक रहा ऐवढस माझं सांगण आहे.....!

    तुझ्या पाठिशी खंबीरपणे राहणार तुझाच एक
                                                                                                   
                              देवदुत

लेखन:- अभय घाटगे.©

टिप्पण्या

Unknown म्हणाले…
Khup kami manse ahet ya jagat je aka shri la samju shaktat

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

कस असत हे नातं

लेख:-शहरातलं सोनं.....

तिच्यासाठीच्या कविता.......