तिच पत्र...

                           ॥ श्री स्वामी समर्थ ॥
                                       तिच पत्र...

               कुठून कशी सुरूवात करू ते सुचत नाही मला,कारण आज मला असच वाटतय एका स्त्रीने या जगात जन्मच का घायचा...फक्त पुरूषाचे अधिकार या जगात आहे का...त्या स्त्री ला तिचा असा प्रश्न माडांयला देतच नाही कोणी....फक्त स्त्रीचा उपयोग पुरूषांना  दोनच गोष्टीसाठी होतो..एक आयुष्यभर राबराब राबायच आणि दुसरी म्हणजे उपभोग घेण्यासाठी,पण का स्त्रीने या जगात जन्म घ्यायचा....पुरूषांच्या मागे मागे करायला,एका स्त्री ला तिचे पण निर्णय असतात.तिच्या पण भावना असतात,प्रत्येक पुरूष सगळे लालची हावरट.त्यांना स्त्रीयांच्या भांवनांची कदरच नाही.....आज हे पत्र मी अशासाठी लिहिते......कारण एक बापच कसा विश्वास घातकी निघाला..आई आज तुला मी सांगते तु कस सहन केल एकाच पुरूषा बरोबर साठ  वर्षे....सांग ना मला....ते पण अशा पुरूषावर बरोबर त्यांने स्वताच्या मुलीला पण.....सोडल नाही...आई तुच बोलायची ना बाप म्हणजे घरच  मागल्य  असतो.मग तोच बाप का अस वागला आपल्या स्वताच्या मुलीशी......आई सहन नाही होत ग त्या दिवशी तु मामा कडे गेली होती...तेव्हा मी घरात घरात एकटी होते...त्या दिवशी बाबा आला आणि त्यांने माझ्यावर बलात्कार केला....आई नको वाटतोय तो कोणत्याही पुरूष्याचा  घानेरडा स्पर्श....आई मला खुप भीती वाटते ग, मी एकटी पडली आता परत दुसऱ्या वेळी अस केल तर बाबा ने...नको विचार पण करायला नको...आई तु जवळ पाहिजे होती माझ्या त्यादिवशी....आज प्रत्येक मुलीचा  बाप आपली  मुलगी सासरी जाताना ढसाढसा  रडतो त्याच्यातला   एक बाप आपल्या मुलीवर असे कृत्य का करतो....हि त्या प्रत्येक मुलीच्या बापाला लाजवेल अशी गोष्ट आहे......अशा या बापला बाप  म्हणायची पण लाज वाटते....कधी कधी वाटत त्याच्या नरडीचा घोट घ्यावा...पण आई तु केलेली शिकवण ,तु आमच्यावर केलेले संस्कार सगळे मधे येतात......ई तुच बोलायची वडिल म्हणजे आपल्यावर मनापासून माया करणार एक पुरूष....जो आपल्या प्रत्येक मुलाचे हट्ट लाड पुरवतो, तो वडिल.......पण असा बाप काहीच उपयोगाचा  नाही जो स्वाताच्या मुलीवरच लैंगिक अत्याचार करतो....त्याचा काय उपयोग....आई मला त्या दिवशी खुप वेदना झाल्या तु असलायला पाहिज होत......पण आज तुझी एक मुलगी त्या माणसं मुळे गमावली तु.....पण माझ्या लहान बहिनीला त्या माणसंच्या हाती पण लागू देऊ नको.....कारण माझी लहान बहिणच आता तुझा एकटीचा सांबाळ करेल............!
      आई आज तुझी हि मुलगी तुझ्या जवळ नसल्यामुळे कदाचित तु दुखी झाली असेल....पण तु दुखी होऊ नको...तुझ्या स्वाताच्या नवऱ्याला म्हणजे माझ्या त्या हलकट बापाला चांगली जन्माची अद्दल शिकव.....माझ्या लहान हिनीला त्या तशाल्या बापा पासून त्या तशाल्या प्रत्येक घानेरड्या पुरूषांपासून दुर ठेव......कारण मी जे भोगल एका संस्कारा मुळे तिच्यावर तेच संस्कार करू नको कि मोठ्यांचा वडिलाधांऱ्या लोकांचा आदर  करायच.......कारण हे प्रत्येक  पुरूष असतात असे स्त्रीयांना फक्त शोभेची बाहुली....आणि त्यांच्या कडे फक्त वासनेच्या दुष्टीकोनातून बघणारे.....अशा पुरूषांना समाजा समोर बेदम मार दिला पाहिजे आई.....पण आली भारतीय संस्कृती मध्ये पुरूष म्हणजे स्त्रिच सर्वच असतो.....पण का अशी संस्कृती केली आपल्या देशात....बाहेरच्या देशात बघितलं तर त्या स्त्रियांना तिचा स्वाताचा निर्णय घ्यायची एक संधी असते....ति का नाही आपल्या भारतीय संस्कृतीत.....आपल्या संस्कृती फक्त एकच रांधा वाडा ऊस्टी काढा....ऎवढच पाहियाला मिळत आपल्या देशात........आई कधी बदलणार हि परिस्थिती, का माझ्या सारख्या अशा अनेक मुलींवर बलात्कार झाल्यावर......आई मी पुढच्या जन्मी तुझीच लेक म्हणून येईल...पण असल्या बापची लेक म्हणून मी येणार नाही........!

आई आपल्या या देशात स्त्रींयावर का होतात अत्याचार…..आजकाल स्त्री म्हणजे एक खेळण आहे का या पुरुषांच्या दुष्टीकोनातून स्त्री ने जन्म जगण्यासाठी घेतला पण हे पुरुष स्त्री जगण नाहीस करतात….त्यांना फक्त स्त्रिया म्हणजे उपभोग घेण्याची वस्तु वाटते आणि आयुष्य भर राब राब राबून  घ्यायची एक वस्तु वाटते पण त्या स्त्रीने जन्म जगण्यासाठी घेतला ना….आयुष्या भर पुरष्यांच्या मागे मागे करण्यासाठी नाही घेतला ना…..आई खरच एक दिवस असा येईल कि जशी विठ्ठलापासुन जशी रखुमाई जशी दुर गेली ना तशी या प्रत्येक पुरुष्यापासुन ति स्त्रिच नाहीशी होईल…..शेवटी सगळे पुरूष एकटे पडतील तेव्हा त्यांना समजेल कि एक स्त्री म्हणजे कोण होती……तरच या पुरुषाला एका स्त्री म्हत्त्वव समजेल……!
           
 आई आज ऎवढच बोलून मी संपवते हे पत्र...पण त्या माणसंला चांगली जन्माची अद्दल घडव.....माझ्या लहान बहिनीला दुर ठेव त्या माणसापासून......कारण अशी माणसं या देशात जन्माला नको यायला ज्यांना फक्त स्त्री म्हणजे उपभोग घेण्याची वस्तु वाटते..........आज स्त्रीयांची संख्या एक दिवस अशीच कमी होईल या सारख्या पुरूषामुळे......आई थांब तु हे सगळ……. तुच एक आई....जगजननी आहे...तुच माता आहे...कारण आई या शद्बातच ताकद असते...आई म्हणजे आदर...त्यात भीती नसते....आई तुच अशा त्या माणसला आणि त्याच्या सारख्या पुरूषांना चांगली जन्माची अद्दल घडव....तरच माझ्या आत्माल्याला शांती लागेल......आणि हो....माझ्या लहान बहिनी ला त्या दुष्ट माणसाच्या सावलीतून दुर ठेव, त्या पुरूषाला दाखवून दे की एक स्त्री म्हणजे खेळण नाही आहे....ति पण एक माणुसंच आहे,ते पण एक बाईमाणुस........... !     
                   तुझी  एक अभागी मुलगी लाडाची लेक
                                   एक ति……!

 लेखन :-अभय घाटगे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

कस असत हे नातं

लेख:-शहरातलं सोनं.....

तिच्यासाठीच्या कविता.......