श्री स्वामी समर्थ
                               तिचं पत्र अखेर मला मिळाल..............

आज खुप बर वाटतय खरच.... कारण मला किती तरी वर्षाने तिच पत्र मिळाल.तिच्या पत्राची दररोज आतुरतेने वाट पाहत होतो,अखेर त्या पत्राच उत्तर मला मिळाल तिच्या पत्रातुन....खर तिने खुप भावनिक पद्धतीने लिहीले पत्र जस तिला खुप काही सांगायचं मला अजुन,पण तिच्या पत्रातुन पण ते स्पष्ट पणे कळत नव्हत,तिच्या आत मध्ये ते असेल पण कागदावर लिहिताना ते उतरल नसेल,पण काय असले तिचा नेमका प्रॉब्रेम हेच कळत नाही.पण मी जाणुन घ्यायचा प्रयन्त केला तिला पुन्हा एकदा पत्र पाठवल,आणि त्या पत्राच उत्तर इतक्या वर्षाने आल.तिने पत्रात तिला जे सांगायचं ते लिहिलेल,मी ते वाचायला सुरुवात केली....
प्रिय तरुण.......
पत्र लिहण्यास कारण कि..तुझ पत्र मिळाल मला तेव्हा काय कराव सुचलचं नाही,पण आता तुला सांगते कि, अरे आत्ता तुला हे पत्र लिहताना खरच मला खुप वाईट वाटतय रे,मी कोणत्या शब्दात तुला सांगु तेच कळत नाही पण मी सांगते तुला..आपल्या दोघांच प्रेम होत, आपण दोघ मनापासुन प्रेम करत होतो,आपण लग्न करण्याचा निर्णय पण घेतलेला.पण आता त्या गोष्टी विसरुन जा,आपल प्रेम,आपल्या आठवणी त्या सगळ्या विसरुन जा,आपल मात्र एक असत आपण आपल्या प्रेमाच्या आठवणीत इतके रमुन जातो कि,नंतर आपल्या पासुन आपल प्रेम दुरावल ना तर ते समजतच नाही,आणि आपण त्याच्या आठवनींन मध्ये जास्त रमतो आणि स्वाताला त्रास करुन मात्र घेतो त्या आठवणींनाचा......(मला काही समजत नव्हत,पण पुढे वाचु लागलो..) अरे actually तुला सांगायचं पण तु खरच दुखी होऊ नको,तु तुझ आयुष्य नव्याने जग..माझ लग्न झाल आहे एका माझ्याच नात्यातल्या मुलाबरोबर,घरचच्या इच्छे खातर कराव लागल,मला खरच त्याच्या बरोबर लग्न करायचं नव्हत.माझ तुझ्यावर प्रेम होत.पण घरच्यांनी माझ्यावर जबरदस्ती केली.का यार या लोकांन कळत ते सगळे अजुन जुन्याच विचारात जगत असे,कोणत्याही अनोळखी मुलाबरोबर बोलायचं नाही,आपल्याच जातीचा पाहिजे,आपल्याच धर्माचा पाहिजे या सगळ्यात आपण अडकलो गेलो रे जात पात धर्म या गोष्टीने आपल्या प्रेमाला विरोध केला.अरे मी सांगितल तुझ्याबद्दल पण तुझा धर्म वेगळा असल्यामुळे त्यांनी घाई केली.माझ्या मनात विचार आलेला आपण दोघ पळुन जाऊन लग्न करायचं पण घरच्यांनी खुप करडी नजर ठेवलेली,तो सैराट चित्रपट आल्यापासुन आपल्याला प्रेमाला जास्तच विरोध करायला लागले रे,त्यांना पण एक भीती आहे पण दोघे पण असच सैराट होईल का त्याची...आज धर्माच्या नावाने जाळपोळ करतात,मारामाऱ्या करतात आणि आपला भारत देशात एकमेकानंच रक्त काढल्याशिवाय कोणाला चैनच पडत नाही..अशा भडव्यांचा राग येतो मला जे धर्माच्या नावाखाली आपल्या प्रेमाला विरोध करतात,आपल्या धमकी देतात,खर तर मला पण अशीच धमकी देलेली माझ्या घरच्यांनी,तु जर आमच्या पसंतीच्या मुलाबरोबर लग्न नाही केल तर तुझ्या त्या याराला जिवंतच जाळीन.मला खुप भीती वाटली,माझ्या घरच्यांनी तुला जर काय केल तर...म्हणुन मी तयार झाले लग्न करायला.तु टेंशन नको घेऊ,आणि विशेष म्हत्तवाच म्हणजे मला विसरुन जा कायमचं......कारण या धर्म आणि प्रेम या युध्यात आपण जगु शकणार नाही कायमचं.................
  एवढ बोलुन मी पत्र लिहियचं थांबते,पण तु माझा विचार सोडुन दे डोक्यातुन कायमचा,कारण आता मी तुझी कधीच नाही होऊ शकणार,pzzzzz मला विसरुन जा,आपण खुप प्रेम केल,एकत्र फिरलो,पण आपल प्रेम हे समाजाला मान्य नव्हत,धर्माच्या नावाने सतत तो समाज आपल्याच नाही अस कितीतरी जोडप्यांच आयुष्य उद्धवस्त करतो.पण जानु तु विसरशील ना रे मला,आपल्या सगळ्या आठवणींना............

                                  तुझी एक तरुणी.....

खर तर मला तिचं पत्र वाचुन खुपच वाईट वाटल,ती का बोलली अस मला विसरुन जा,त्या प्रेम करणाऱ्या मुलामुलींना धर्माच्या नावाखाली जे राजकारण करतात अशा समजला भिऊन तिने असा निर्णय घेतला,म्हणजे तिने सरळ त्या समाजाला भिऊन आमच्या प्रेमाला दुर केल...खरच कधी वाटतय प्रेम करण हा गुन्हा आहे का..जर गुन्हा असेल तर मान्य आहे आम्ही गुन्हा केला ते,पण त्याची ऐवढी मोठी शिक्षा का द्यायची त्याची...प्रेम ही भावनाच नैसर्गिक आहे,ते प्रेम प्रत्येक मुलांमुलीना होऊ शकतो,मग तो दुसऱ्या धर्माचा नायतर जातीचा असेल तरीही..तरीपण हा समजा का मान्य करत नाही..परवाच माझ्या कानवर अशीच आमच्या प्रेमासारखी बातमी आली,नेरुळ मध्ये एक मुलगी एका मुलावर प्रेम करत होती,त्या मुलापण माहित होत पण तो तिला मित्रच मानायचा.पण ती मुलगीच त्याच्या मागे लागलेली दोघेही एकत्र झाले.पण तिच्या घरच्यांना समजल तेव्हा त्याच्या घरात घुसुन त्याला मारुन टाकल....केवळ तो मुलगा वेगळ्या जातीचा होता म्हणुन,खरच आपला हा मादरचोत समाज आणि त्यांच्या कसले कसले थुकरट विचार,यांने आपल्या देशाच नाव खराब होत,शेवटी तो समाज दाखुन देतो आपला भारत देश कसा आहे ते,रक्त काढण ,मारामाऱ्या करण हिच तर आपल्या भारताची स्पेशालिटी आहे...मला खुप दुख झाल,कि ती गेली मला कायमची सोडुन मी मुस्लमान असलो म्हणुन काय झाल..पण माझा संपुर्ण जन्म या महाराष्ट्रात गेला,मला मराठी चांगली येते,लालबाग-परळ सारख्या एरियात माझ बालपण गेल..केवळ माझा धर्म वेगळा आहे म्हणुन आमच्या प्रेमाला या समाजाने विरोध केला...माझे अब्बु नेहमी म्हणायचे माणुसंकीचं हा खुप मोठा धर्म,ज्या माणुसकीखातर इतरांची मदत करतो त्याला अल्लाचा नेहमी आर्शिवाद असतो,अब्बुचे हे शब्द खरच बरोबर होते,माणुसंकी मध्येच खरा देव लपलेला असतो,माणुसं नावाच्या जमातीनेच हा धर्म आनला.साईबाबांच्या मंदिरात मुस्लिम लोक जातात,हाजाली दर्ग्यामध्ये हिंदु लोक जातात तेव्हा कोणालाचा  धर्म दिसत नाही का त्यांचा,शेवटी तेव्हा सगळे कबुल करतात कि सर्वधर्मसमभाव मग प्रेम केल तर हा समाज धर्म आनतो मध्ये...का असा वागतो तो समाज तेच कळत नाही,परत मग दुसऱ्या धर्मातल्या मुलीवर किंवा मुलावर कोणत्याच मुलामुलीनें प्रेमचं करायचं नाही का........

ती मला विसरुन जा अस बोलली तेव्हा खरच कसतरी झाल जीवाला,जिच्यावर मनापासुन प्रेम केल,तिच्या बरोबर खुप फिरलो,खुप गप्पा मारल्या या आठवणी सगळ्या विसरुन जा ती बोलली..आता कस विसरुन जाऊ या प्रेमातल्या आठवणी....प्रेम न केलेल्या आठवणी आपण विसरुन जाऊ शकतो,पण प्रेमात केलेल्या आठवणी नाही विसरुन जाऊ शकत....तिला हेच कळाल नाही,घरच्यांच्या आणि समाजाच्या भितीमुळे तिला अस कराव लागल.....पण असु दे आता तु बोलते विसरुन जाऊ तुला...OK As u wish…..विसरेन मी तुला कारण माझ्या पत्राच उत्तर मिळाल इतक्या वर्षांने तुझ्याकडुन,त्यामुळे विसरेल मी तुला,आणि आपण घावलेल्या आठवणीनी पण....उगाच त्या आठवणी मनात ठेऊन त्रास का करुन घेऊ स्वाताला,म्हणुन मी विसरेल तुला आणि तुझ्या आठवणीनींना,तु रहा खुश तुझ्या नवीन आयुष्यात.....................

             शेवटी मला तिच्या पत्राच उत्तर मिळाल,आता उद्या पासुन ती तिच्या नवीन आयुष्याचा सुरुवात कणार आणि मी माझ्या नवीन आयुष्याला सुरुवात करणार...इतके दिवस मनातील मळ तसाच ठेवुन आम्हाला त्रास व्हायंचा,आत्ता नाही होणार कारण तु मनातला मळ निघुन गेला ना पत्रातुन बोलल्यावर.कारण आपण खुप दुख साठवुन ठेवतो,मनात,मग त्याचा त्रास आपल्याला आयुष्याभर होतो.पण हे मात्र बरोबर केल आम्ही,या पत्रातुनच आम्हाला जे सांगायंचं होत ते सांगितल...शेवटी आम्हाला समजल कि या समाजाला प्रेमापेक्षा धर्मच मोठा................!


लेखनः- अभय घाटगे.




टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

कस असत हे नातं

लेख:-शहरातलं सोनं.....

तिच्यासाठीच्या कविता.......