||श्री स्वामी समर्थ|| ||श्री जोर्तिलिंग प्रसन्न ||
हल्लीची नाटकात काम करणारी ती...........
हल्ली नाटक,एकांकिका खुप यायला लागल्या वेगळ्या विषयांच्या,आणि त्या
नाटकात काम करणाऱ्या तिच प्रमाण तर जास्त दिसुन येत.नाटकाची आवड असणारी ती आता
सगळ्या समाजाच्या रोश पत्कारुन नाटकात काम करते,खर तर पुर्वी कोणतही स्त्रि नाटकात
काम करायला खुप भीत असे,तिच्यासाठी नाटक म्हणजे काहीतरी वेगळच वाटत असे, आणि समाज
काय बोलेल त्याच पण एक त्यांच्या मनात दडपन असायचं,त्यामुळे पुर्वीच्या काळी
पुरुषांनाचा स्त्रि पात्र करावी लागत असे,पण आता पुर्वीच्या मानाने खुपच बदल झाला
आहे,आजकाल हल्लीच्या मुली तर नाटकात बिनधास्त काम करताना दिसतात,वेगळ्या वेगळ्या
एकांकिका करताना दिसतात.त्यांच्या मध्ये भीती नसते कसली पण एक आत्मविश्वास
असतो,स्वातावरचा..हल्लीचं मी काही एकांकिका स्पर्धे मध्ये अनेक एकांकिका बघीतल्या
पण म्हत्वाचं सांगायचं तर त्यातल्या तिचं काम तर खुपचं बेस्ट होत,म्हणजे माझ्या
पाहाण्यात आलेल्या एकांकिका शामची आई,ओवी,लायसन्स,दप्तर,विभांवतंर,इन सर्च ऑफ, भगदाड,रिगंण,पुण्याची
आत्मंभान डॉट कॉम या अशा वेगळ्या विषयांच्या एकांकिके मध्ये तर तिचं काम खुपचं
वेगळ होत,मोठ्या आत्मविश्वासाने,मोठ्या उर्मीने त्या सगळ्या ती आपल काम दाखवत
होत्या,त्यातलीच शामची आई एकांकिका तर खुपच भावली आई आणि मुलांच्या
नात्यासंबधावरुन ती एकांकिका होती,त्यातली म्हातारी आईची भुमिका २२ वर्षाच्या तरुण
मुलीने केलेली.पण तिने ती भुमिका व्यवस्थित निभावलीआणि प्रेषकांच्या टाळ्या पण खुप
मिळवल्या.परत ओवी एकांकिकेमध्ये तर प्रत्येक स्त्रि पात्राने आपली भुमिका चांगलीच
निभावली,मग ती ओवी असेल,आणि आश्रमशाळेतील मॅडम असले,नायतर कामवाली,ओवीला दिसत
असलेल्या दोघी...आणि शाळेतल्या सगळ्याचं मुली त्यांनी प्रत्येकाने आपल काम खुप
मोठ्या आत्मविश्वासाने आणि जिद्दीने केल.तस दप्तर,विभांवतर,इन सर्च ऑफ,भगदाड लायसन्स,रिंगण,आत्मभान.कॉम अशा एकांकिकेमधल्या
तिने आताच्या समजाला दाखवुन दिल कि,हम भी कुछ कम नही है....खर तर हल्लीची नाटकात
काम करणारी ती काळाप्रमाणे बदलली.पुर्वीची ती तर घरी पण भीती होती नाटक करायचं
म्हणटलं तर पण हल्लीची ती आता मनमोकळ्यापणाने घरी तिच्या नाटकात काम केलेल्याचं सांगते,तिचं
नाटक बघायला घरच्यांना बोलते.हेच बदलत्या काळाचं वैशिष्ट आहे,म्हणजे त्या बदलत्या
काळाबरोबर हल्लीच्या स्त्रिया पण बदलत चालल्या त्यांना जे हव आहे ना ती गोष्ट त्या
मिळवताचं मग त्या प्रत्येक एकांकिका स्पर्धा जिंकल्यावर ते पाहियाला मिळत.अशी ती
नाटकात काम करण्यासाठी खुप मेहनत घेणारी,आपल्यातला आत्मविश्वास वाढवणारी,ती एक
दिवस नक्कीचं नाट्यश्रुष्ठीत आपल नाव मिळवेल.....
खरच हल्लीच्या
धावपळीच्या जमण्यात या प्रत्येक ती,आपल काम,शिक्षण सांभाळुन नाटकात काम करतात,
इथेच कौतुक करण्यासारखी गोष्ट आहे,परत त्यांच्या घरातले आता त्यांना पाहिजे तेवढा
सपोट करतात.पण कधी कधी घरांच्यांना भीती पण वाटत असते आणि काळजी पण वाटत असते
कि,आपली पोरगी ऐवढी चांगली ACTING करते,तिला यश तर लाभेल ना,याचं भीती पोटी कधी कधी
ते त्या मुलींच नाटक बंद करतात,पण या हल्लीच्या मुली पण कमी नाही,घरी कितीही बोलत
असले नाटक बंद कर आणि जॉब कर...तरीही या नाटकात पुन्हा काम करतात,आपला जॉब वैगरे
सांभाळुन.हीच खरी ओळख आहे तिची त्या नाटकात काम करणाऱ्या तिची..कितीही संकट आल
तरीही त्या काहीतरी मॅनेज करतात आणि आपल नाटक पुन्हा सुरु करतात.आज नाट्यश्रुष्ठीत
कितीतरी ती आहे,ज्यांच करियर झाल,म्हणजे उदाहरण द्यायंच झाल तर मुक्ता बर्वे,
स्वानंदी टिकेकर,सखी गोखले,पुजा ठोंबरे,तेजश्री प्रधान,सुरुर्ची अडाळकर,केतकी
थत्ते,ऋतुजा बागवे.या अनके अभिनैत्रीने आपला ठसा नाट्यश्रुष्ठीत उमटवला आहे,आणि
अजुनही उमवटात....आपल्या देशाची ओळखच स्त्रि आहे,आज हिच स्त्री तिच्या आवडीच्याचं
क्षेत्रात भरारी घेऊ लागली आहे,ही खरी कौतुकास्पद गोष्ट आहे.ती आता तिचं अस स्थान
निर्माण करते,ती एक वेगळी ओळख निर्माण करते.मला तर या प्रत्येक नाटकात काम
करण्याऱ्या तिचं खुप नवल वाटत कि,नाटकात किंवा एकांकिकेमध्ये काम करताना त्या
कसलीच भीती नाही ठेवत पुर्वीच्या स्त्रियांनसारखी... मस्तपैकी बिनधास्त नाटाकाचा
प्रयोग करतात.तुम्ही स्त्रियांने दाखवुन दिल नाटकात काम करणाऱ्या त्या प्रत्येक
पुरुषाला कि अब हम भी आपके साथ आऐ है,और अब हम ही बाजी मार लेगें..........
आपला देश स्त्रिप्रधान देश
आहे,या देशात स्त्रियांवर ऐवढे अत्याचार होऊन पण पुन्हा त्या प्रत्येक स्त्रिया
नव्या जोमात परत बाहेर पडतात,आणि दाखुन देतात कि हम ओरतो को डर नही है किसीका...क्यु
किं हम सब ओरते अभी एक साथ है....हीच ऐकी हल्लीच्या स्त्रियांची मला आवडली.याचं
गोष्टीने नाटकात काम करणारी ती मोठ्या आत्मविश्वाने नाटकात काम करु शकते,तोच
आत्मविश्वास तिला एक दिवस यशराच्या शिकरापर्यंत नक्की पोहचवेल, ती नाटकात काम
करण्यारी तिच्यातल्या मेहनतीने आणि कष्टाने ती खुप मोठी अभिनैत्री होईल,हल्लीची
नाटकात काम करणारी ती..................!
लेखनः- अभय घाटगे.
टिप्पण्या