बाईमाणुसं.....!



                           बाईमाणुसं....!

         अस म्हणतात कि, आपला देश हा पुरुषप्रधान देश आहे,वर्षनुवर्षे इथे पुरुषांच वर्स्चव चालत आल आहे,पुरुषांचे अधिकार चालत आले आहे...पण स्त्रिला जराही किंमत देत नाही...का अस तेच कळत नाही..वर्षानुवर्षे स्त्रीने फक्त पुरुषाच्या ताटावरच मांजर बनुन राहिचं का..खरच देवाने स्त्रि का निर्माण केली,कारण देवाला पण सगळीकडे लक्ष द्यायला जमणार नव्हत म्हणुन त्याने स्त्रि निर्माण केली....पण येथे तर स्त्रीला वेगळीच वागणुन अजुनपण दिली जाते या पुरुषप्रधानसंस्कुतीत.....हेच या पुरुषप्रधान संस्कुतीच चुकतय..त्या स्त्रीला कोणच समजुनच घेत नाही..ती पण एक माणुसं आहे ते पण एक बाईमाणुसं......आजाकाल स्त्रीया पुरुषांच्या बरोबरीने प्रत्येक क्षेत्रात झेप घेऊ लागल्या आहेत,पण ती पुरुषप्रधान संस्कुती अजुनही त्या स्त्रीकडे कमी नजरेने बघते,म्हणजे या स्त्रिया काहीच करु शकत नाही आयुष्यात,फक्त चुल आणि मुल ऐवढच करु शकतात...असा त्यांचा विचार आहे...खर त्यांच इथेच चुकतय काळाप्रमाणे ही लोक आपले विचार का नाही बदलत तेच काही केल्या कळत नाही,स्त्रिया आज अवकाशात गरुडभरारी घेतात,त्यांना जे हव ना ते त्या मिळवताच,याच कारण एकच असेल मुलगी शिकली प्रगती झाली...आज प्रत्येक मुलगी तिला हव ते शिक्षण घेऊ शकते,आणि तिच स्वप्न साकार करते...पण  गावाकडे मुलींना शिकवतात,पण गावात राहुन नाही,एकदा माध्यमिक शिक्षण झाल कि,पुढच्या शिक्षणासाठी तिचे आईवडिलच तिला शहरात शिकायला पाठवतात...पण गावात राहुन तिला शिकायला नाही सांगत..कारण त्यांना माहित असत ना,या गावात मुलगी शिकली काय आणि प्रगती झाली काय...याचा कोणालाच फरक पडत नाही.....पण का अस गावाचा समाज करतो,गावाच्याच लेकीना गावात राहुन चांगल शिकुन का देत नाही....ही अशी मानसिकता गावाच्या समाज्याच कुठेतरी चुकतय अस मला वाटतयं..कारण कोणत्या मुलीला साहजिक वाटणारचं कि आपल्या आईवडिलांजवळ राहुन आपल शिक्षण पुर्ण कराव..पण आईवडिलच असा निर्णय का घेतात..या गावाच्या समाज्याला भिऊन..समाज काय म्हणेल,लोक काय म्हणतील..काय कडेच सगळ्यांच लक्ष असतं मग ती स्त्रि कशी पुढे जाईल....आज आपण सावित्रीच्या लेकी म्हणतो या सगळ्या स्त्रियांना,पण याच स्त्रियांना जर गावाकडे अशी वागणुक मिळत असेल तर काय उपयोग याचा....एका बाईमाणसं दुख कोणच समजुन घेत नाही,या पुरुषप्रधानसंस्कुतीत...फक्त त्या बाईने पुरुष म्हणेल तसत वागाव,डोक्यावर चौवीसतास पदर ठेवावा,गावाकडे तर आपल्यापैक्षा लहान मुलांच्या पाया गावातल्या सुनांनी पडण्याची अशी रित आहे काही गावात...हे एकुन खर तर खुपच वाईट वाटत..आजच्या आधुनिक शतकात स्त्रियांनची पण अशीच अवस्था..परत अजुनही स्त्रियांवर अत्याचार होतात,दररोज कुठे बलात्कार अशा बातम्या ऐकायलाच मिळतात..हे अस किती दिवस...स्त्रियांची अशी विटंबना करुन काय मिळत यांना तेच काही केल्या कळत नाही....या प्रत्येक पुरुषांना स्त्रि म्हणजे कोण वाटली कोण यांना एखाद्या रस्त्यावर पडलेला कचरा....एक दिवस असा नक्की यायला पाहिजे,पंढरपुरात त्या विठ्ठलला पासुन जशी रुक्कमिणी दुर गेली ना..तशी त्या प्रत्येक पुरुषांपासुन ती स्त्रीच अशी दुर जाईल..मग त्या पुरुषांन कळेल स्त्री काय हे ते.......!”

     आजकाल प्रत्येक स्त्रीया त्याची एक वेगळी ओळख करु लागल्या,प्रत्येकाला हेवा वाटेल अस काम आज स्त्रिया धाडसांने करु लागल्या,पण यामध्ये त्यांच्या जवळच्या माणसांनची साथ पण भेटते..तस पुर्वीच्या स्त्रियांच्या बाबतीत अस होत नव्हतं..त्या स्त्रिला  आपल्याला जे करायचं होत ते ती मनातचं ठेवत होती..कारण तिला भीती होती ना,पण आजच्या स्त्रिमध्ये अजिबात भिती नसते,त्या बिनधास्त वावरु शकतात या जगात...खर तर हेच खुप मोठ वैशिष्ट आहे आजच्या स्त्रियांच कि,कोणतही गोष्ट आपल्याला मिळवायची असेल ना,तर घाबरुन चालायचं नाही,उलट त्याच भीतीला घालवायला शिकल पाहिजे...हेच त्या प्रत्येक यशस्वी स्त्रीच गुपित आहे....अस मला वाटतयं.....खर तर अस म्हणतात एका यशस्वी पुरुषांच्या मागे एक तरी स्त्री असतेच...पण आजच्या काळात यामध्ये थोडा बदल करायला पाहिजे एका यशस्वी स्त्रिच्या मागे एकतरी पुरुष असतो..जो तिला साथ देईल असा......म्हणुन तर ती स्त्रि चंद्रावर जाऊ शकते,सिनेमात काम करु शकते,आयपियस अधिकारी,पोलिस बनु शकते,डॉक्टर,इंजिनियर,अँनिमेटर, तिला जे पाहिजे ते ती होऊ शकते.....खर तर इथेच त्या स्त्रिचं कौतुक कराव वाटतं कि आज देशात स्त्रियांबद्दल ऐवढ सगळ वाईट प्रकार सुरु आहे,तरीपण त्या गोष्टीला विसरुन मोठ्या जिद्दीने त्या आपल्या क्षेत्रात काम करतात....ही माणुसं तर आहे,पण एक बाईमाणुसं आहे...आपल स्वप्न साकार करण्यासाठी,आपल्याला जी गोष्ट हवी ती मिळणारी..ती एक भारतीय नारी आहे.........

         हल्ली प्रत्येक ठिकाणी मुलीच आघाडीवर दिसतात.. वंशाचा दिवा पाहिजे म्हणुन मुलींना आतल्याआत मारुन टाकत असे पुर्वी..पण आता मुलगीच जन्माला यावी अस प्रत्येक घरातल्या आईबापाच स्वप्न असतं..कारण ते म्हणतात ना पहिली बेटी धनाची पेटी..अगदी तसच काहीस..कारण स्त्रि वर्गामुळेच हे जग पुढे जाणार आहे..कारण पहिल्या महिला राष्ट्रपती प्रतिभाताई पाटिलच होत्या ना...खर तर कोणत्याही मुलीचे विचार लहान असले तरही ते विचार तिच्यासाठी खुपच मोठे असतात..आणि त्या विचारांनी त्या मुली त्यांच्या  आयुष्यात स्पेशल असतात...त्यामुळे कोणत्याही स्त्रीला कमी समजु नका,ती काय आहे ते तिच्याशिवाय कोणालाच माहित नसतं...प्रत्येक महिलांना त्यांच्या विचारांनी या समाज्यात वावरु द्या,एक दिवस नक्की त्या आपल नाव मोठ करतील..आणि त्या प्रत्येक पुरुषीवर्स्चव दाखवणाऱ्या पुरुषाला दाखवुन देईल कि,आम्ही स्त्रिया जिजाऊंच्या मुली आहोत..कधीच हार मानत नाही......... 

            मला अस वाटतय आज प्रत्येक स्त्रीने तिचा सन्मान मिळवला,तिचा अधिकार ,तिची प्रतिष्ठा सगळी मिळवली..पुर्वीपार एक परंपरा चालत आलेली,ती म्हणजे प्रत्येक घरात एकतरी बापमाणुसं असतो,पण त्या घरातली बाईमाणुस कोणालाचं दिसत नाही....खर तर तिच्यामुळे तर संपुर्ण घराची परंपरा,ती संस्कुती,नवीन पिढीला कळतात ना..आजकालच्या याच बाईमाणसांच कौतुक करायला पाहिजे,कारण घर सांभाळतात,नंतर ऑफिसची काम करतात..यामध्ये त्या घरातल्या नात्यांमधली परंपरा,तो विश्वास तसाच ठेवतात..अशा बाईमाणसांला माझा सलाम...........कारण एक बाईच संपुर्ण घराची परंपरा जोपासते ना हिच खरी कौतुकास्पद बाब आहे ना,म्हणुन एकदातरी त्या स्त्रिच्या विचारांना साथ द्या मग आपल्या भारत देशाचं नाव मोठ होईल खऱ्या अर्थाने.........!


लेखनः- अभय घाटगे 


     



                         
                            







                         



टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

कस असत हे नातं

लेख:-शहरातलं सोनं.....

तिच्यासाठीच्या कविता.......