ती...!
कविता:-ती...
कवि:-अभय घाटगे.
ती कधी तरी येते,तर ती कधीतरी अंधारात एकटी राहते..
ती फक्त रात्रभर आपल्याला online ठेवते,तर ती कधीच अचानक पणे निघून जाते..
ती इथुन तिथुन सारखी वळवळत असते,तर ती कधी कधी खुपच शांत असते...
कधी कधी ती येतच नाही, मग तिची वाट बघत असतो काळोख्या अंधारात...
ती भेटते कधीकधी पण ट्रेन, बस मध्येच भेटते,घरी मात्र ती कधीच ऐवढी येत नसते....फक्त ती girl friend शी म्हत्वाची चँट़िंग करत असताना येते,आणि चँटिग बंद केल्यावर ती अचानक पणे निघु़न जाते....
ती येत नाही म्हणून असच मन कुठेतरी अंधारात विचार करत बसतं...ती ते विचार चालु असताना पण ती येत नाही....तेव्हा मात्र आपण असचं निश्चित पडलो असतो विचारांच्या संशोधनात...
पण ती मात्र अजुन येत नसते,एकटाच वेड्यासारखा पडलो असतो घराच्या छताकडे बघत,पण साध ती यायचं नाव पण घेत नसते..
तरही अजुन ती विचारच करायला लावत असते,पण विचारांच्या जगात राहुन राहुन कंटाळा आलेला असतो नुसता..पण ती तिच्याच धुंदीत राहुन अजुन आलेलीच नसते...
काहीवेळा नंतर हळुहळु ती येते,पण तेव्हा मात्र पहाट झालेली असते...आईची उठायची बडबड चालुच झालेली असते,पण ती आल्यामुळे मला उठुच वाटत नसत...आणि मग ती भेटल्यावर काहीच सुचत नाही, सतत तिचाच विचार येतो मनात...
कारण ती फक्त माझी झोप असते,ती फक्त माझी झोप असते,झोप असते.....!
टिप्पण्या