एक गोष्ट तिची.........!
॥श्री स्वामी
समर्थ ॥
एक गोष्ट तिची.........!
एक दिवस तो असाच कोल्हापूर ला जात होता....तेव्हा तो ज्या express ने जाणार
असतो....ति express प्लॅटफॉर्म नं ५ वर येणार होती...पण जरा लेट
होती ति express त्यादिवशी.....! त्याच्या बरोबर अनेक प्रवासी होते......अचानक
त्याला एक सुंदर चेहरा दिसला.....ति एकटीच
होती तिच्या बरोबर कोण नव्हत... .तिने लाल रंगाच र्डेस घातलेला.....तो तिच्या कडे
पाहायचा सारखा....पण तिच्याकडे पाहून एक समजल तिला कसलतरी टेंशन होत...तिच्या
चेहऱ्यावर ते दिसत होत...तिच्या बरोबर बोलयला जाव तर ति अनोळखी.....त्यामुळे एक
भीती वाटत होती... सगळे प्रवासी वैतागले अजून का येत नाही आहे express....?
अचानक
अनाऊसमेंट झाली..." आज प्लॅटफॉर्म नं ५ वर येणारी महालक्ष्मी express
20-30 मिनिट उशिरा येणार आहे.....सगळे प्रवासी वैतागले....पण ति अजूनही
चिंतेत होती...ति प्लॅटफॉर्मवर नं ५ च्या एका बाकड्यावर बसली...तिथे कोणच बसल
नव्हत अजून....हा तिथे गेला आणि बसला....तो अधून मधून तिच्या कडे बघायचा....ति
त्याला अजून चिंतेत वाटत होती...तो तिला विचारतो (बोलतो ) शेवटी " हॅलो आपल्याला कोल्हापूर जायचा
का...? ति त्याच्या कडे बघते आणि बोलत......नाही म्हणजे मला कोल्हापुर ला जायचं
आहे....ति बोलते आणि तुम्हाला कोठे जायचं आहे...? तो बोलतो मला पण कोल्हापूरला
.........परत दोघांच लक्ष दुसरी कडे जात.....परत काही वेळाने तो
विचारतो.....अं....अं म्हणजे तुम्ही मुंबईत अस फिरायला आला होता की job साठी...!
ति बोलते...नाही म्हणजे मुंबईची आहे.....माझ लग्न झाल मुंबईतल्या एका मुंलाबरोबर
नायतर मि मुळची कोल्हापूरची आहे...त्याला शॉक बसतो...तरी पण तो बोलतो...ok मग
तुमचा नवरा येत नाही तुम्हाला सोडायला.....ति बोलते...काय सांगायचं तो माझ्या
शरीरावर प्रेम करायच...कधी त्यांने
माझ्यावर मनापासून प्रेम केल नाही.....तो बोलतो...म्हणजे तो बोलायला जाणरार
तेवढ्यात तिला ति आठवण येते..आणि डोळ्यांतून पाणी येत....तो बोलतो..काय झाल माझ
काही चुकलं का..? ति बोलते नाही...मी त्या वाईट, घानेरड्या स्पर्शाच्या आठवणीने रडली...तो बोलतो कोणती ति आठवण....! ति
बोलते..त्यादिवशी तर त्यांने हद्दच केली....घरात पार्टी ठेवलेली, त्याची सगळे मित्र आलेल ,त्याच्या काही मित्रांनी माझ लैगिंक शोषण केल...तो त्यांचा घांणेरडा
स्पर्श, शी.....पण त्याला जराही वाटल नाही..ज्यावर आपण सात जन्म घालवते ति....त्याच
नावाच कुंकू लावते ति....काही वाटल नाही
तो आरामात दारू पित बसलेला......पण तो मला
त्यांच्या तावडीतून वाचवायला नाही आला......हे सगळे पुरूष असतात एकसारखे ज्यांना फक्त स्त्रिया म्हणजे उपभोग
घेण्याची वस्तू वाटते.......तो बोलतो..एक मिनिट पण सगळे पुरूष नसतात असे....काही
चागंले पण असतात...ति बोलते..हो माहिते ना पण जे पुरूष ज्यांना फक्त स्त्री म्हणजे
फक्त एक उपभोग घेण्याची वस्तू वाटते... आज जो आपल्या देशात बलात्कार नावाच रोग आला
ना.....तो यांसारख्या वाईट पुरूषामुळे......तेवढ्यात express येते....ते
दोघे express मध्ये चढतात विशेष म्हणजे दोघेही एकाच डब्यात
चढात..दोघांच सिट नंबर समोरासमोर असतो....ते दोघे बसतात....परत त्यांच्या गप्पा
चालू होता....तो बोलतो खरच आपला देश असा आहे किती ही अच्छे दिन आऎगे म्हणतात पण
अच्छे दिन येत नाही कारण आपल्या देशातल्या स्त्रीयाच असुरक्षित आहे एवढ्या......मग
पुढे काय झाल नंतर काय बोलला तुमचा नवरा....ति बोलते....तो काय बोलणार कारण त्याला
लाज पण वाटली नाही तेव्हा , आपल्या बायकोचा आपलेच मित्र आत जाऊन लैगिंक शोषण करतात , नंतर सगळे गेले...नवरा काय असून
नसल्यागत वागायचा....दुसरा दिवस उगवला मला खुप भीती वाटत होती....आईबांबाना सांगव
तर त्यांना टेंशन येईल....म्हणून मी काही नाही सांगितल........पण मला खुप भिती
वाटत होती...जो पुरूष दारावर येईल त्याची पण.... कारण त्या प्रत्येक अनोळखी
पुरूषाचा एक वेगळाच घानेरडा स्पर्श नको होता मला......मग गावी कोल्हापूर ला आई
बाबांकडे जाण्याची ठरवल....रिझवेशन काढला...आणि आज मी माझ्या आई बाबांकडे
जाते....मला ना त्याच प्रेम....त्याच्या
प्रेमात फक्त वासना होती.....अस प्रेम नकोच मला.....तो बोलतो तर म्हणजे तुम्हाला
तुमच्या नवऱ्याने फक्त शाररिक सुखासाठी ठेवल होत....पण तो असा का त्याच्या
मित्रांना मग तुमच्यावर शाररिक भोग घेण्यासाठी का पाठवल....हे चुकल आणि तुमच्या
नवऱ्याच ही चुकलं...स्त्री हि अशी एक व्यक्ती आहे की परमेश्वराला या जगात सगळी
कडे लक्ष ठेवता नाही येणार ना....म्हणून त्यांने स्त्री निमार्ण केली.....ति फक्त
शाररिक दुष्ट्या जवळ येण्यासाठी नाही तर..मनाने प्रेमाने जवळ येण्यासाठी...तुमचा
नवरा हेच चुकला..तो येवढा यशस्वी झाला त्या मागे तुमचा हात आहे...एका यशस्वी माणसांच्या
मागे एक स्त्री असते अस बोलतात ना ते बरोबर आहे......त्यांने तुमच्या वर प्रेम
करायला पाहिजे होत...त्याच असा फायदा उचलायला नाही पाहिजे होता......कारण ते
स्त्री पुरूषाच नात आकर्षणा पुरत मर्यादित नसत....तर ते नात मनापासून समजून, प्रेम
मैत्रीच नात असत.......मग पुढे काय करायच ठरवलय तुम्ही..आईबाबांना तुम्ही सगळ
सांगणार की नाही....! ति बोलते तोच विचार आहे आईबाबांना घडलेला सगळा प्रकार
सांगायचा. मी माझ्या निर्णयावर आत्ता ठाम आहे.तो बोलतो कोणता निर्णय..ति बोलते घटस्पोट घ्यायचा मला असा माणुसं नको त्याच्याकडे
फक्त वासना आहे....तो तिच्या त्या निर्णयाने गप्प बसलाय कारण त्याला कळू
चुकलेल कि एका स्त्रीने ऐवढेच सहन केल त्या
माणसाच, पण तो तिला चांगली वागणुकच देत नव्हता, त्याला काही बोलायच सुचत
नव्हत.तरीपण तो बोलतो खरच तुम्ही Great आहात.म्हणजे आज
तुम्ही तुमचा स्वाताचा निर्णय घ्यायच ठरवल...expressसाताऱ्याच्या
पुढे गेलेली....त्या दोघांच बोलन सुरू होत....ति बोलते....आज माझ आयुष्य सगळ त्या
माणंसामुळे उदध्वस्त झाल.....दररोज एक एक क्षण माझा रडण्यावारी जातो. अस वाटायच
त्याचा जीव घ्यायचा होता....पण...मनात एक भीती वाटत होती...तो बोलतो.....काय
घाबरायची काय गरज आहे...तु कायद्याने पण त्याच काय करायचे ते करू शकत
होती...त्याच्या विरूद्ध पोलिस कंपलेट करायची ना.....ति बोलते...कशी करणार पोलिस
कंपलेट....कारण आमच्या आईवडिलांनी आणि आपल्या
भारतीय संस्कुतीत आपल्याला एक
शिकवण दिली आहे. नवरा म्हणजे सर्वेच...एकदा लग्न झाल
कि नवरा आपला सर्व काही......त्या मुळे कस करणार सांग ना.....! तो बोलतो...मग नवरा
म्हणजे सर्वेच ना मग याच्या नवऱ्याच्या मित्रांनी तुमच्या वर अत्याचार केला...साधा तो तुला
त्यांच्या तावडीतून वाचवू पण शकला नाही....हा असला नवरा तुमचा.....? ति बोलते जाऊ
दे आता काय बोलायचीपण माझा एकच
निर्णय आहे कि घटस्पोट.........! तो बोलतो ठिक आहे
जस तुला वाटत ते कर....काऱण आपली भारतीय
संस्कुती त्या प्रत्येक स्त्री लग्न झाल्यावर पुरुषाच्या तालावर नाचते ना,आज या
देशात त्या स्त्रीला तिचा असा प्रश्नच मांडायला देत नाही कोणी...पण आज तु तुझा
प्रश्न खऱ्या अर्थाने मांडला.तु तुझा असा एक निर्णय घेतला...कोल्हापूर ला express
पोहचत
आलेली......पण तो मनात हळूच हसला कारण त्याला अशी एक स्त्री भेटलेली ति तिच्या
नवऱ्या च्या त्रास ला आणि त्यांने तिच्या बरोबर जे काही केल ना....त्यात ति खंबीर
पणे धीट होती....कारण ति जास्त खचलेली नव्हती......तिच्यात जिद्द होती....पुढच
आयुष्य घालवण्याची...ति खुपच वेगळी होती.....कोल्हापूर स्टेशन येत...दोघे ही express
मधून
उतरले तिचे वडिल आलेले तिला नेयायला...ति
त्याला बोलली....ok बाय....तो पण बोलला ok बाय......ति अशी बोलून गेली आपल्या
वडिलांना बरोबर गेली..........
तेव्हा
त्याला समजल कि पुणे कोल्हापूर प्रवासात
एक ति भेटलेली...ति वेगळी होती....तिची एक गोष्ट एकून मलाच वाईट
वाटले....पण ति धीरधाकट होती आपल्या नवऱ्याने एवढ आपल्यावर अत्याचार केला....तरी
ति ने तिचा एक निर्णय घेतेला कि घटस्पोट घेण्याचा......तिचा तो निर्णय एक वेगळा
होता......कारण तिने तिचा स्वताचा निर्णय घेतलेला.....आज त्याला एक वेगळी गोष्ट कळली
गोष्ट तिची...............!
ज्या
व्यक्ती बरोबर आयुष्य घालवतो ति व्यक्ती जर अस वागली तर या जगातील प्रत्येक स्त्री
तिचा असा एक स्वाताचा
निर्णय घेईल ,कारण
ति पण एक माणुसंच आहे.....ते पण एक बाईमाणुसं.....आज तिने जो निर्णय घेतला तो
योग्यच आहे.....असा निर्णय त्या प्रत्येक स्त्री ने घ्यायला पाहिजे...जिच्या बरोबर
अस चुकीच वर्तन होत.......आणि आपल्या देशातील याच गुन्हेगांना त्याच स्त्री ने धडा
शिकवला पाहिजे....आपला निर्णय घेऊन अशा लोकांना भर चौकात सगळ्या स्त्रीयांनी एकत्र
येऊन त्यांना मारल पाहिजे....तरच खऱ्या अर्थांने आपल्या देशात अच्छे दिन
येतील....आणि आपल्या देशातल्या स्त्री यांना
खऱ्या अर्थांने स्वातंत्र्य मिळेल............!
लेखन:- अभय घाटगे.
टिप्पण्या