मुंबईकरांच रक्षण करणाला पोलिस पण त्याच्या रक्षणाच काय....?

                                                 श्री स्वामी समर्थ
              मुंबईकरांच रक्षण करणाला पोलिस पण त्याच्या रक्षणाच काय....?


मुंबई पोलिस....ऊन असो वा पाऊस,याची परवा न बाळगता आपल्या मुबंईचे रक्षण करतो,काठी घेऊन बंदोबस्त ला उभा राहतो.पण आज त्याच्या रक्षणासाठी कोण आहे,हो आज त्या मुबंई पोलिसाच्या रक्षणासाठी कोण आहे......? याच उत्तर ना कोणत्या नेत्यांकडे,ना ति वाईट जनता जी पोलिसांचे नियम पाळत नाही ति....कारण की आज पोलिसांनवरच्या हल्ल्याच्या खुप घटना घडल्या,त्यातच आत्ताच घडलेली एक घटना एका ट्रॉफीक पोलिस कॉनस्टेबल विलास शिंदे यांना काही बाईकस्वारांनी मारहाण केली,कारण फक्त छोटच होत.पोलिस कॉनस्टेबल विलास शिंदे यांनी या एका बाईकस्वाला हेल्मेट घातल नव्हत म्हणुन आडवल.त्यामुळे त्याने आपल्या भावाला बोलवल,त्याच्या भावाने मागुन येऊन एक लॉड आनुन कॉनस्टेबल विलास शिंदे याच्या डोक्यात मारल,त्यामुळे ते बेशुध्द झालेआणि काही दिवसांनी ते मरण पावले...काय चाललय काय आपल्या मुबंईत जो आपल्या मुंबईचे रक्षण करणाला पोलिस त्यावरच आज हल्ले झाले.त्याच रक्षण कोण करणार मग, नेते लोक फक्त त्या पोलिस कुटुंबाना पैशाची मदत करणार आणि मोठी मोठी आसवाशंन देणार.पण त्या पोलिसाच्या रक्षणाच काय.....तोच पोलिस स्वाताच्या जीवाची पर्वा न करता या जनतेच रक्षण करत असतो.पण त्याच्यातली वाईट जनता पोलिसांना का किंमत देत नाही.पोलिस तुमच्या भल्यासाठी ते नियम लावतात ना, तेच नियम काही जनता का नाही पाळत...आज पोलिस आपल्या घरच्या बरोबर न राहता,नेहमी दुसऱ्याच बघत असतो.काही जनतेने तर महिला पोलिसांवर पण हल्ले केले.एका मुलीने तर पोलिस स्टेशन मध्ये एका पोलिसाला मारहान केली.दिवसेंदिवस पोलिसांच्या हल्ले होवायला लागेल आहे.आज तो त्या मुबंईचे ,त्या मुबंईकरांचे रक्षण करणाला तो पोलिस खरच त्याच्या रक्षणाच काय मग तो पण एक माणुस आहे ना, त्याला पण मन आहे,त्याला पण घर ,बायकापोर आहे.त्या पोलिसाची परिस्थती जैसे थे वैसे है.....पण त्या पोलिसाला अजुनही संरक्षण कोणच देत नाही.त्या नेत्याला संरक्षण पोहिजे,त्या अभिनेत्याला संरक्षण पाहिजे. पण पोलिसाच्या संरक्षणासाठी कोणच लक्ष देत नाही.वर्षानुवर्ष हेच चालल आहे आपल्या राज्यात…… त्या छत्रपती शिवाजी महाराज्यांच्या काळात  त्यांच्या मावळ्यांना पण संरक्षण होत.पण इथे तर आपल्या या २४ तास ड्युटी करणाऱ्या त्या पोलिसाला मात्र संरक्षण  का नाही..? हाच  प्रश्न प्रत्येक पोलिसांच्या कुटुंबाना पडलाय.आज ते कुटुंब आपल्या घरच्या त्या मेन व्यक्तीची घरी परत येण्याची आतुरतेने वाट बघत असतो,त्या पोलिसांची एक काळजी वाटते असते,त्या पोलिस कुटुंबांना.त्यामुळे खरच तो पोलिस या मुबंईच उभा राहुन काठी घेऊन रक्षण करतो.पण त्याच्या रक्षणाच काय....?  का तो पोलिस अशीच ड्युटी करणार का...? कि त्या बेक्कल नियम तोडणाऱ्या जनतेची बोलणीच खाणार का.....? 

     आज  तो प्रत्येक पोलिस येवढ्या ताणतणाव खाली राहुन सुध्दा आपल कर्तव्य बजावतो,पण त्याला कोणच कस समजुन घेत नाही.आज आपण ऐवढे सुरक्षत राहतो ते त्या पोलिसामुळे काऱण तो रात्रभर जागुन आपल रक्षण करण्यास BUSY असतो.कोठे गणेशउत्सव असु दे,तर नवरात्र असु दे नायतर दसरा दिवाळी असु दे....आपण आपल्या घरी enjoy करत असतो,पण तो पोलिस त्याच वेळी आपल मन मारुन आपल्या बायकापोरांन बरोबर न राहता आपल्या रक्षणासाठी २४ तास ऊभा असतो.फक्त या जनतेसाठी....पण त्या पोलिसालाचा संरक्षण नाही का....तो पोलिस पण एक माणुसं आहे ना...त्या पण मन नावाची गोष्ट आहे.या राजकारणी लोकांना कळतच नाही हे...फक्त त्यांना पोलिस पाहिजे स्वाताच्या रक्षणासाठी.........! 
     
   
   माननीय मुख्यमंत्री यांना फक्त विचरायच कि तुमच्या मागे  संरक्षणासाठी ऐवढे पोलिस का ठेवले...का नाही तुम्ही त्याच्या संरक्षणासाठी बघत...तुम्हाला मुख्यमंत्री म्हणुन निवडुन  त्या जनेतेने आनल असेल,पण त्यातलीच काही मत या पोलिसांची होती.ति काय तुमच्या संरक्षणासाठी त्यांनी मत दिली नव्हती काय...त्यांच्या संरक्षणासाठी दिलेली....पण तुम्ही तर त्यांना संरक्षण दिलच नाही.....आज तो पोलिस असुरक्षित आहे,तुमच्यासारख्या नेत्यांमुळे तुम्हाला फक्त तुमच्या संरक्षणाची पडलेली आहे ,त्या पोलिसाच्या नाही.....त्यामुळे आत्ता तरी सुधारला जे मुबंईच संरक्षण करतात ना, त्याच्याच संरक्षणाच बघा...तरच आपल्या मुबंईला संरक्षण मिळेल..आणि ति बेक्कल जनता जरा वाहतुकींचे नियम पाळा आधी,त्या सिग्नलला थांबत जावा. कारण सिग्नलवरच देश ओळखला जातो............!


लेखनः- अभय घाटगे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

कस असत हे नातं

लेख:-शहरातलं सोनं.....

तिच्यासाठीच्या कविता.......