प्रिय ताईस
श्री स्वामी समर्थ
प्रिय ताईस.......
आज तुला हे पत्र मी लिहतो कारण की तुझ्या लग्नाला मी येऊ शकलो नाही,इथे परदेशात माझी परिक्षा चालु होती तेव्हा मी आलो नाही म्हणुन तु नाराज नको होऊ.खर तर तु हसत जा सासरी तु होतीस तेव्हा आपण खुप मज्जा करायचो पण आत्ता घरी परत आल्यावर घर एकदम शांत शांत असणार कारण माझ्याबरोबर तेव्हा मस्ती करायाला माझी लाडकी बहिन नसणार ना, आणि एक ताई जिजु कसे आहेत त्यानचा गायनाच रियाज कसा चालु आहे,मला अस समजल ते खुप सुंदर गातात खर तर त्यांनी इंडियन आयडल मध्ये जायच ना तर असो जिजुना माझ्यातर्फे all the best सांग....ताई मग आत्ता तु सासरी गेल्यावर आम्हाला संगळ्याना विसरशील मला , सनी ,निधी ,अभिला विसरशील तु...कारण तुला तिथे नविन नाती भेटली ना,त्यांच्या मध्ये तुला तो खोडकर सनी, ड्रामेबाज मी ,डॅशिंग अभि, dancing Quinn निधी कोणच नसणार पण तु नाराज होऊ नको,आम्ही नेहमी तुझ्यासोबत असु...पण ताई आपण जी धमाल करायचो ति कदाचित येणार नाही तुला...मे महिण्याच्या सुट्टीत मामाच्या गावी गेल्यावर आपण भरपुर आंबे खायचो,आंबाच्या झाडावर खोडकर सनी चडायचा आणि आंबे काढुन द्यायचा..आपले आजोबा तर आपल्या फिरायला घेऊन जायचे दररोज संध्याकाळी बागेत...पण जसे आजोबा गेले तस ते मामाच गाव नाहीस झाल...सगळे मामा वेगळे झाले शेवटी,आपल सगळ्या भांवच येणजाण तुटल.आपण दोघ असायचो एकत्र पण आपली ति गँग नव्हती एकत्र..मामाच्या गावाची ति आंब्याची झाडे,त्या झाडाला बांधलेला सुंदर झोका..आणि सर्वात म्हत्तवाच म्हणजे झाडावर रपारप चढणार तो खोडकर सनी....सगळे कोठे तरी हरवलेल ,ताई खरच आज जेव्हा आपली माणसं आपल्यापासुन दुर जातात ना तेव्हा अगदी एकट एकट वाटत...तुझ लग्न झाल्यामुळे तु दुर गेली....मला एक भाऊ मिळाला तो पण आत्ता दुर गेला,आपण सगळे खुप दूर गेलो... watsapp फेसबुक मुळे आपण जवळ येतो ,पण खर त्यातला मायेचा गोडवा दुर येत नाही.त्या नात्यामधले ते अनमोल क्षण कुठेतरी हरवले...बर ते जाऊ दे ताई उगाच इमोशनल होयायला नको,तु सासरी आहे तुझ्या तुला पण रडु येईल...माझा इकडचा film miking चा अभ्यास संपुण मी लकरच भारतात परत येईल,आपल्या गावी.तेव्हा तु आणि जिजु या....एक सांगु ताई मला इथे करमतच नाही सारख...भारतात येण्याच मन करत सारख,इकडची संस्कुती खुपच वेगळी आहे,इकडच जेवन तर फास्ट फुडच असत...मला सारखी आईच्या हातच्या पुरणपोळीची आठवण येते..आणि तुझ्या हातच्या चिकन फ्राय ची आठवण येते...इथे तसचल जेवणच मिळत नाही..पण ताई एक दिवस मी तिथे आलो ना नक्की दे तुझ्या हातची चिकन फ्राय...
बर मग ताई तुला एक गोष्ट सांगायची....ताई मी तुझ्यासाठी एक वहिनी बघुन ठेवली माझ्या बरोबर पुण्याला होती नाटयाशास्त्रला आमच तिथेच प्रेम झाल,तिला पण मी आवडाचो मला पण ति आवडायची...ति लेखिका , दिग्दर्शिका आणि अभिनेत्री पण आहे...तिच नाव आहे स्नेहल...मी भारतात आलो की, लग्नचा विचार करणार आहोत...तर तु पण ये आईबाबांना समजावयाला...ताई खरच मला वाटायच पण नाही माझ्या प्रेमात कोणतराी पडेल पण हिच्यासारखी मुलगी प्रेमात पडली...आज हिच मुलगी मला माझ्या घरच्यांना एकत्र सामावुन घेइल ...कारण ताई हि मुलगी इतर मुलींन सारखी नाही.."नुसताच नखरा आणि गावभर चक्करा...."यांच्या सारखी ति नाही आहे.ति मनाने , बोलण्याने खुप चांगली मुलगी आहे....ताई खरच का प्रेमात पडलेल्यावर आपण कर्तव्य दक्ष बनतो...कारण मी ऐवढा कर्तव्य दक्ष झालो कि सांगायलाच नको...ते फक्त तिच्यामुळेच........पण ताई तु दुखी होऊ नको ति जरी मला मिळाली असली ना तरीच माझ्या आयुष्यातली ती तिसरी स्त्री, पहिली आई,आणि दुसरी तू..कारण तिच्या बरोबर तर मी माझ संपुर्ण आयुष्य घालवणार....आणि तुझ्या बरोबर आपली लहानपनीच्या मज्जा अजुन करणार...मला चांगल आठवतय ताई लहानपनी जेव्हा मला आईबाबा मार द्यायचे ना तेव्हा तु मध्ये येऊन मला मार खाण्यापासुन वाचवायची...पण ताई शाॅरी हा तुला...कधी कधी मी तुझ्या चुगल्या आईबाबांना सांगायचो त्यामुळे उगाच तुला त्यांचा ओरडा बसायचा...ताई मी भारतात आलो ना की आपण सगळे भेटुया तु ,मी ,सनी ,निधी खुप धमाल करु आपण हा पण मामाच्या गावाला आत्ता काहीच नसणार ति आंब्याची झाड , त्या झाडावर बांधलेला झोका...आणि सर्वात म्हवत्ताच म्हणजे मामी हातच मस्त जेवण...कारण आत्ता मामा मामी पण जवळ घेत नाही..मामा तर आत्ता खायाला काहीच नाही आनत..मेन म्हत्तवाच म्हणजे मामा बोलतच नाही आपल्या बरोबर...फक्त काही मामा बोलतात...पण जाऊ दे आपण सगळे भेटुया....
ताई रक्षाबंधन लकरच येणार आहे,मी त्याच्या आधी यायच बघेल,पण तुला काय आणु येताना मला असच वाटतय ताई मी लग्नला पण नव्हत ना त्यामुळे तुला मी साडी घेउन येतो,,,माझ्याकडुन तुला माहेरची साडी.....अजुन अमेरिकन चॉकलेट, जिजुनसाठी कोर्ट टाय...
ताई खरच खुप बर वाटल बोलुन तुझ्या बरोबर...लग्नाच्या दिवशी पण नव्हतो ना, तुझ्या बरोबर बोलायलाच भेटल नाही..watsapp , फेसबुक तर आपण भेटतच होतो, पण त्या मध्ये मायेच ,प्रेमाच संभाषशन व्हायच नाही....ते आपण नॉरमल बोलायचो...ताई तु गेलीस ना मला खरच एकट वाटतय खुप,माझी सतत बाजु घेणारी ,माझ्या चुका दाखवुन देणारी ति तु आहे....पण आज तु लग्न एेवढ घाईत केल कि तुझ्या भावाला तु विसरुन गेली,,,,काय पाहिल ग त्या मुलाच्यात तु म्हणजेच जिजुंच्यात...तु पळुन जाऊन लग्न केलस आणि तुला माझा ,आईबाबांचा एकदा पण विचार आला नाही का ग....तु फक्त तुझ्या प्रेमाबद्दल विचार केला,पण आमच्या नाही....ताई मी पण प्रेम केल ग पण मी तिला पळुन नाही नेणार तर तिला तिच्या घरीच्यांची परमिशन मागुन नेणार...पण तुझ्या नवऱ्याला म्हणजेच जिजुना जरा पण वाटल नाही का कि आपल्या आईबाबंकडे जाऊन तुझा हात हात मागायचा...ऐवढी घाई होती का तुला लग्न करायची.आज आईबाबंना सार गाव बोलतोय...पण तु मात्र खुश असेल...सांग ना ताई का तु अस केल....का थांबली नाही माझ्यासाठी, आईबांबासाठी.का तु आमच नात ऐवढ्या लवकर तोडायला निघायली....ताई आपल्या आयुष्यातुन आपली सख्खी नाती दुर गेली ना मग आपणच खुप एकटे होतो....हे पण मला स्नेहल ने सांगितल..कारण तिचा मोठा भाऊ असाच आपल्या बायकोला घेऊन दुसरीकडे गेला....ताई पण आम्ही करु माफ तुला , जे दुख देऊन तु गेली ना आम्हाला ते कधीच नाही विसरु शकणार..
कारण आपल्याला मार लागल्यावर त्या जखमा लगेच औषध लावल्यावर निघुन जातात,पण त्याचा होणारा त्रास,यातना तशाच राहता अगदी कायमच्या......त्यामुळे ताई आत्ता तु काळजी घे,आईबांबानची एकदा माफी माग आणि त्यांना कडकडुन मिठी मारा....कारण त्यांना खुप त्रास झाला तु गेल्यावर...कि आपली मुलगी पळुन का गेली.........त्याच दुख बघुन खरच मला खुप वाईट वाटल.......पण मी त्यांना फोनवर शांत केल.त्यांच टेँशन दुर केल...त्यांना फक्त ऐवढच बोललो कि, आयुष्यात एक नात कमी झाल तरी दुसरी नाती लगेच आपल्या आयुष्यात येतात...कारण नाती जोडन खुप म्हत्तवाच आहे......ताई एवढ बोलुन मी हे पत्र इथेच थांबवतो,पण आईबाबांना एकदा तरी भेटायला जा तु आणि जिजु आणि दोघेही त्याची माफी मागा पाया पडा..ते नक्की माफ करतील...कारण आईबापाचा आपल्या मुलांनवरचा राग फक्त काही सेंकदापुरताच मर्यादित असतो..काही सेंकदानंतर तो पुन्हा अबोला बनतो......चल मग ताई भारतात आलो कि भेटुया आपण.......
तुझा लाडका भाऊ...
लेखनः- अभय घाटगे.

टिप्पण्या